घरट्रेंडिंगराज्यातील घडामोडीबाबत सोशल मीडियावर मिम्सचा महापूर

राज्यातील घडामोडीबाबत सोशल मीडियावर मिम्सचा महापूर

Subscribe

दिलीप कोठावदे ।  नवीन नाशिक

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे आमदार हे सोमवारी संध्याकाळी नॉट रिचेबल झाले आहेत. ते सध्या सूरत या भाजपच्या बालेकिल्ल्यात असल्याची माहिती समोर आली आहे. राजकारण असो की अन्य कोणत्याही घडामोडी, त्याच्यावर नेटकऱ्यांना सोशल मिडियाच्या माध्यमातून व्यक्त होण्याची संधी मिळत असते. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीवर देखील उलट-सुलट चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. अर्थात या सगळ्या घडामोडीला विनोदाची झालर लावण्याचे काम विविध पोस्ट द्वारे केले गेले आहे.

- Advertisement -

एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने प्रदर्शित झालेल्या धर्मवीर चित्रपटातील आनंद दिघे यांच्या तोंडी असलेला, ” एकनाथ कुठे आहे ? ” या संवादाला जोडून शिंदे यांच्या सोबत देवेंद्र फडणवीस यांचा फोटो जोडून विनिद निर्मिती करण्याचा प्रयोग सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. एवढेच नाही तर सगळ्या राजकिय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या भाषणातील भावमुद्रेच्या फोटोसोबत, “आता येतांना १४५ आमदार घेऊनच या… “ही पोस्ट देखील वाचणाऱ्याच्या चेहेऱ्यावर हसू उमटविल्याशिवाय रहात नाही.

याशिवाय स्वतः एकनाथ शिंदे यांनी आजच्या योगदिनाचं औचित्य साधत केलेली फेसबुक पोस्टही सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या पोस्टमध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या शुभेच्छा देताना फोटोच्या बॅकग्राउंडला कमळाच्या फुलाचा वापर केला आहे. एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांसह नॉट रिचेबल होणं आणि त्यांच्या आजच्या पोस्टमध्ये कमळ दिसणं, याचे फार मोठे राजकीय अर्थ असल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरू आहे. थोडक्यात काय तर,घटना किंवा विषय काहीही असो,त्यावर मार्मिक तितकेच मिश्किल विनोद निर्मिती करण्याची संधी नेटकऱ्यांकडून केली जाते यात शंका नाही.

कोणते मिम्स होताय व्हायरल 

  • माझ्या फोनला नेटवर्क प्रॉब्लेम असल्याने कदाचित not reachable असू शकेल, कृपया गैरसमज नसावा मी एकनाथ शिंदे यांच्या सोबत नाही……….😂 आपलाच 🙏
  • राज्यपाल भगतसिंग कोशारी तातडीने झोपण्यासाठी रवाना…😂😂😂
  • 145 आमदार घेऊन या नायतर एवढा मोठा दगुड घालीन डोसक्यात – तात्या भडकले
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -