घरCORONA UPDATEपूरग्रस्त आदिवासींना कोरोना योद्धयांकडून मदतीचा हात

पूरग्रस्त आदिवासींना कोरोना योद्धयांकडून मदतीचा हात

Subscribe

पूरग्रस्तांच्या मदत व पुनर्वसनाकरिता मुंबईतील निवासी डॉक्टरांनी त्यांच्या केईएम, सायन व नायर हॉस्पिटलमधील मार्ड संघटनेमार्फत गडचिरोलीतील आदिवासींना आर्थिक मदत केली.

काही दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे पूर्व विदर्भाला पुराचा जोरदार फटका बसला. पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया व नागपूर जिल्ह्यांतील शेकडो गावे पाण्याखाली जाऊन हजारो लोक बेघर झाले आहेत. त्यामुळे पूरग्रस्तांच्या मदत व पुनर्वसनाकरिता मुंबईतील निवासी डॉक्टरांनी त्यांच्या केईएम, सायन व नायर हॉस्पिटलमधील मार्ड संघटनेमार्फत आर्थिक मदत केली आहे.

विकासाच्या मुख्य प्रवाहापासून कायमच वंचित, लॉकडाऊनमुळे ठप्प पडलेले जीवनमान आणि महापूर या अस्मानी संकटाच्या दुहेरी दुष्टचक्रात गडचिरोलीतील आदिवासी सापडले आहेत. सलग दोन वर्षे महापुराचा फटका बसल्याने या भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुरामुळे घरातील दैनंदिन जीवनावश्यक साहित्यापासून शेतमालाचेही फार मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे पूरग्रस्तांच्या मदत व पुनर्वसनाकरिता मुंबईतील निवासी डॉक्टरांनी त्यांच्या केईएम,सायन व नायर हॉस्पिटलमधील मार्डसंघटनेमार्फत गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करत सामाजिक उपक्रम राबवत ३४ हजार २२२ इतकी रोख रक्कम भामरागडसह अतिदुर्गम विभागांमध्ये काम करणार्‍या स्वयंसेवकांना दिली आहे. त्याचप्रमाणे येणार्‍या काळात अधिक मदत उभी करून गडचिरोलीला पाठवण्याचा प्रयत्न करणार आहोत असल्याचे मार्डकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

गतवर्षी भामरागड भागात पूरग्रस्तांना मदत पोहोचवली होती. महापुराच्या निमित्ताने मुंबई व महाराष्ट्रातील स्वयंसेवी संस्थांनी समोर येऊन या भागात मदत करण्याचे आवाहन केईएम मार्डचे अध्यक्ष डॉ. दीपक मुंढे, सायन मार्डचे अध्यक्ष डॉ अविनाश सकनुरे, नायरचे मार्ड अध्यक्ष डॉ. सतीश तांदळे यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -