अलिबाग येथील पीएनपी नाट्यगृहाला लागली भीषण आग

अलिबागमधील (Alibaug) स्थानिक कलाकारांचे हक्काचे व्यासपीठ असणारे, रसिकांना कायमच अनोख्या कार्यक्रमाची पर्वणी देणार्‍या पीएनपी नाट्यगृहाला (PNP theater) बुधवारी संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास भीषण आग लागली.

अलिबागमधील (Alibaug) स्थानिक कलाकारांचे हक्काचे व्यासपीठ असणारे, रसिकांना कायमच अनोख्या कार्यक्रमाची पर्वणी देणार्‍या पीएनपी नाट्यगृहाला (PNP theater) बुधवारी संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. दुरुस्तीचे काम सुरू असताना वेल्डिंग चे काम सुरू असताना ठिणगी पडून आग लागली असावा अंदाज व्यक्त केला जात आहे.(A huge fire broke out at the PNP theater in Alibag)

आग विझविण्यासाठी नगरपालिका ,आरसीएफ, गेलं कंपनी ,जेएसडब्लू कंपनीचे अग्निशमन दल दाखल माणगाव महाड,पनवेल येथून सुद्धा अग्निशमन दल मागविण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे यांनी माहिती दिली.

अलिबाग येथील नाट्यगृहाला भीषण आग लागली या आगीत नाट्यगृहाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीचे कारण काही स्पष्ट झाले नाही. ही आग साडे तीन ते चारच्या दरम्यान आग लागली अशी माहिती उपस्थितांनी दिली. आगीचे लोट मोठ्या प्रमाणात दिसत असल्याने आगीने भीषण रूप धारण केले. आगीचे नेमके कारण अस्पष्ट आहे. पण शॉर्ट सर्किटने आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सुदैवाने जीवितहानी टळली

या आगीत सुमारे पन्नास लाखाची साउंड सिस्टीम सहित छत, खुर्च्या जळून पूर्ण खाक झाली आहे. सुदैवाने नाट्यगृहात कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम नसल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही. शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस तथा आमदार जयंत पाटील हे एका कार्यक्रमानिमित्त माणगाव येथे असताना त्यांना आग लागल्याचे समजताच त्यांनी तातडीने अलिबाग येथील घटनास्थळी आले आणि नाट्यगृहाला लागलेली आग पाहून त्यांच्या आणि सुप्रिया पाटील याच्या डोळ्यात अश्रू आले.

पीएनपी नाट्यगृहाला आग लागल्याचे समजताच अप्पर जिल्हाधिकारी अमोल यादव,उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे, सामान्य रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, गुन्हा अन्वेषण शाखेचे प्रभारी दयानंद गावडे, रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आस्वाद पाटील, अलिबाग नगरपालिकेचे मुख्याधिकारी अंगाई साळुंखे, नगराध्यक्ष प्रशांत नाईक,अलिबाग पोलीस निरीक्षक शैलेश सणस आदीं घटनास्थळी दाखल झाले. यावेळी रेवदंडा अलिबाग बाह्यवलन रस्त्यावरील वाहतूक पोलिसांनी सुरक्षेच्या कारणासाठी बंद केला होता.


हेही वाचा – …तर वीज पुरवठा होईल खंडीत, असा मॅसेज तुम्हालाही आला असल्यास सावधान!