सातारा : महाराष्ट्रातील कास पठार हे पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत. दरवर्षी हजारोच्या संख्यने देशभरातील पर्यटक हे कास पठारवर गर्दी करतात. यंदा सलग सुट्या आल्यामुळे कास पठारवरील फुले पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी झाली. यामुळे फुलांनी बहरलेले कास पठारे हे पर्यटकांनी फुलून गेले चित्र पाहयला मिळाले. कास पठार पाहण्यासाठी सप्टेंबर-ऑक्टोबर हा कालावधी सर्वोत्तम मानला जातो.
हेही वाचा – साताऱ्यातील यवतेश्वर घाटात दरड कोसळली, कास पठारावर जाणारा रस्ता बंद
कास पठारावर येण्यासाठी रस्यांवर तब्बल चार-पाच किलोमीटरची रांग लागली आहे. पठारावर येण्यासाठी अरूंद असा मार्ग असल्यामुळे परिसरातील रस्त्यांवर चार-पाच किलोमीटर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. या गर्दीवर नियंत्रणात मिळवण्यासाठी कास पठार समिती प्रयत्न करत आहे. यंदा राज्यात हवा तसा पाऊस न पडल्यामुळे कास पठार हे फुलांनी पूर्णत: बहरलेले नाही. पण तुरळ फुलांनी भरलेले आहे. तरी देखील कास पठारावरील ही फुळे पाहण्यासाठी पर्टकांनी गर्दी केली आहे.
हेही वाचा – १ लाख १० हजार पर्यटकांची ‘कास’ पठाराला भेट!
कास पठार हे सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये वसलेले आहे. हे पठार कोयना वन्यजीव अभयारण्याला लागून आहे. पठारावर आढळणारी फुले आणि वनस्पतींच्या अनेक मौल्यवान प्रजाती आहेत. कास पठारला व्हॅली ऑफ फ्लॉवर्स असे म्हणतात.