घरमहाराष्ट्रपुणेसज्जनगडावर आढळला बिबट्याचा बछडा, वनविभागाकडून खबरदारी घेण्याचे आवाहन

सज्जनगडावर आढळला बिबट्याचा बछडा, वनविभागाकडून खबरदारी घेण्याचे आवाहन

Subscribe

सातारा – सज्जनगडावर मंगळवारी बिबट्याच्या बछड्याचे दर्शन झाले. काल संध्याकाळच्या सुमारास सज्जनगडावरील रामघळ परिसरात काही तरुणांना बिबट्याचा बछडा खेळताना दिसला. या तरुणांनी त्याच्या बिबट्याच्या बछड्याचे फोटो काढले. या बाबत माहिती मिळताच काही वेळात सज्जनगडावर गर्दी वाढली. त्यानंतर तात्काळ वनअधिकाऱ्यांनी याबाबत माहिती देण्यात आली. यानंतर वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी दाखल झाले.

मध्यरात्री मादी बिबट्या बछड्याला घेऊन गेली –

- Advertisement -

सज्जनगडावर जाणाऱ्या मार्गावर भाविकांना एक बिबट्याचे पिल्लू एकटेच खेळताना आढळले होते. यावेळी जवळपास मादी बिबट्या दिसला नाही. भाविकांनी त्याचे फोटो काढले होते. बछडा दिसल्याची माहिती मिळताच वनअधिकारी आणि कर्मचारी इथे दाखल झाले. त्यांनी बिबट्यावर देखरेख ठेवली. बछडा इथे असल्याची जाणीव मादी बिबट्याला झाली. मात्र, ती थेट येथे येऊन बिबट्याला घेऊन गेली नाही. कर्मचाऱ्यांनी बछड्याला सुरक्षित ठिकाणी सोडले. त्यानंतर मादी बिबट्या तिथे पोहोचली आणि बछड्याला घेऊन गेली.

वनअधिकाऱ्यांकडून विशेष खबरदारी –

- Advertisement -

वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना बिबट्याचा बछडा दिसला. मात्र, मादी बिबट्या कुठेच दिसला नाही, त्यामुळे वनविभागाचे सहा ते आठ कर्मचारी सज्जनगड परिसरात तळ ठोकून होते. त्यानंतर मध्यरात्री मादी बिबट्या तिथे आली आणि बछड्याला घेऊन गेली. बिबट्याचा बछडा सज्जनगडावर असल्याचे कळल्यानंतर आम्ही तातडीने पथकासह त्या ठिकाणी पोहोचलो. बछडा घाबरुन जाऊ नये म्हणून अधिक खबरदारी घेतली होती. कर्मचाऱ्यांनी त्यांचे मोबाईल फोनही सायलेंट मोडवर ठेवले होते. कर्मचारी त्याच्यावर नजर ठेवून होते. या बछड्याचे वय अंदाजे सहा महिने होते, अशी प्रतिक्रिया वनअधिकाऱ्यांनी दिली. वनविभागाचे अधिकारी रात्रभर तिथे तळ ठोकून होते. शिवाय सकाळीही येऊन त्यांनी पाहणी केली. येथे येणाऱ्या भाविकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -