घरमहाराष्ट्रशरद पवारांचं एक पत्र आणि 52 जातींचा ओबीसीत समावेश; बच्चू कडूंनी थेट...

शरद पवारांचं एक पत्र आणि 52 जातींचा ओबीसीत समावेश; बच्चू कडूंनी थेट सांगितलं, खरे ओबीसी नेते…

Subscribe

बच्चू कडू म्हणाले की, ओबीसींचे खरे नेते शरद पवार आहेत. 52 जाती शरद पवार यांच्या एका पत्रामुळे ओबीसीमध्ये आल्या, त्यावेळी मराठा समाजही त्या पत्रात समावेश केला असता तर काम जमलं असतं.

मुंबई: मागच्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्याच्या मागणीवर ठाम आहेत. तर दुसरीकडे मंत्री, अजित पवार गटाचे नेते आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मात्र ओबोसीतून मराठ्यांना आरक्षण देण्याला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे भुजबळांना टीकेचं धनी व्हावं लागत आहे. असं असतानाच प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी एक मोठं विधान केलं आहे. छगन भुजबळ नाही तर शरद पवार हे खरे ओबीसींचे नेते आहेत, असं विधान त्यांनी केलं आणि त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. (A letter from Sharad Pawar and inclusion of 52 castes in OBC Bacchu Kadu said directly true OBC leader )

बच्चू कडू म्हणाले की, ओबीसींचे खरे नेते शरद पवार आहेत. 52 जाती शरद पवार यांच्या एका पत्रामुळे ओबीसीमध्ये आल्या, त्यावेळी मराठा समाजही त्या पत्रात समावेश केला असता तर काम जमलं असतं. 52 जाती एका पत्रामुळे ओबीसीमध्ये येत असतील तर मराठा समाजाचं सर्व वस्तुस्थितीला धरून असूनही का होत नाही, हा मुळात प्रश्न आहे, असंही आमदार बच्चू कडू म्हणाले.

- Advertisement -

मनुष्यबळ वाढवावं- जरांगे पाटील 

कुणबी प्रमाणपत्र शोधण्यासाठी सरकारकडून लावण्यात आलेलं मनुष्यबळ हे काही ठिकाणी अपूरं आहे. त्यामुळे नोंदी शोधण्यास विलंब होत आहे. त्यामळे सरकारला विनंती आहे की त्यांनी मनुष्यबळ वाढवून नोंदी शोधाव्यात जेणेकरून 24 डिसेंबरपर्यंत कुणबी असल्याचं दाखले मिळतील आणि आरक्षण देता येईल.

जरांगे पाटलांचा महाराष्ट्र दौरा

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी लढा देणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आता महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. 15 नोव्हेंबरपासून या दौऱ्याची सुरूवात होणार आहे. राज्यातील सर्व मराठा एकजूट व्हावा यासाठी हा दौरा केला जाणार आहे. हा दौरा 15 ते 23 नोव्हेंबरपर्यंत असणार आहे.

- Advertisement -

विदर्भ, तसंच मराठवाडा आणि कोकण अशा टप्प्यांमध्ये पुढचा दौराही केला जाणार आहे. तसंच, यावेळी त्यांनी मराठा समाजाला आवाहन केलं आहे की, कोणीही आरक्षणासाठी आत्महत्या करु नये.

(हेही वाचा: शरद पवार-दिलीप वळसे पाटील यांची ‘मोदीबागे’त भेट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -