घरमहाराष्ट्रराणेंसारखा माणूस देवेंद्रजींना पचू शकतो, मग...; शिवशक्ती-भीमशक्तीवरून अंधारेंचा भाजपाला टोला

राणेंसारखा माणूस देवेंद्रजींना पचू शकतो, मग…; शिवशक्ती-भीमशक्तीवरून अंधारेंचा भाजपाला टोला

Subscribe

Sushama Andhare on BJP | शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि वंचित बहुजन आघाडी या दोन्ही पक्षांनी दोन दिवसांपूर्वी युतीची घोषणा केली. मात्र, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांच्यात पूर्वीपासून मतभेद आहेत.

Sushama Andhare on BJP | मुंबई – शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यात आधीपासूनच वाद आहेत. याला प्रकाश आंबेडकर यांनीही दुजोरा दिला होता. त्यामुळे अशा परिस्थितीतही शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र आल्याने महाविकास आघाडीत कशाप्रकारे जागावाटप होईल, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यावर शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी नारायण राणेंचा उल्लेख करत मिश्किल टीप्पणी केली आहे.

सुषमा अंधारे म्हणाल्या की, नारायण राणेसारखा माणूस देवेंद्रजींना पचू शकतो. इतकं बोलणारा माणूस त्यांना चालतो. नारायण राणेंची लेकरं त्यांना पचू शकतात, पटू शकतात, एकत्र बसू शकतात. मग नक्कीच आमचं धुराबंधाऱ्याचं भांडण नाही. मला वाटतं या सगळ्यांच्या संबंधाने निश्चितपणे महाविकास आघाडीमध्ये सर्वसमावेशक भूमिका घेतली जाईल, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

- Advertisement -

हेही वाचा – दीपक केसरकर म्हणतात आदित्य ठाकरे यांना अनुभव नाही; वाचा नेमके प्रकरण काय?

शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि वंचित बहुजन आघाडी या दोन्ही पक्षांनी दोन दिवसांपूर्वी युतीची घोषणा केली. मात्र, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांच्यात पूर्वीपासून मतभेद आहेत. या मतभेदाचा महाविकास आघाडीवर किती परिणाम होईल याविषयावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. मात्र, महाविकास आघाडीतील घटकपक्षांनी कोणाला मित्रपक्ष बनवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, असं कालच अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे. त्यालाच दुजोरा देत सर्वजण एकत्र बसून सर्वसमावेशक भूमिका घेतली जाईल, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

- Advertisement -

दरम्यान, या दोन्ही पक्षांची युती झाल्यानंतर या युतीचा राज्याच्या राजकारणाला फारसा फायदा होणार नसल्याचं बोललं जात आहे. मात्र, या युतीच्या घोषणेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर आरोप केले, आशिष शेलारांनीही दावे केले. याचा अर्थ या दोघांच्या युतीमुळे फरक पडत आहे, असंही सुषमा अंधारे म्हणाल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी विकासकामांच्या उद्घाटनासाठी मुंबईत आले होते. त्यांनी प्रचाराचा नारळ फोडला. महापालिकेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून चाललं आहे. याचा अर्थ निवडणुका लवकरच लागणार आहेत. पुढच्या निवडणुकाही टप्प्यात आहेत. किंबहुना सरकार लवकरच पडू शकतं, असा सूचक इशाराही त्यांनी दिला आहे.

हेही वाचा – शिंदे गट-भाजपासोबतच्या युतीत डावललं जातं, अखेर आठवलेंनी व्यक्त केली खंत

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -