घरमहाराष्ट्रनवऱ्याला मारण्याची धमकी देत 'त्याने' महिलेवर केला सात महिने बलात्कार

नवऱ्याला मारण्याची धमकी देत ‘त्याने’ महिलेवर केला सात महिने बलात्कार

Subscribe

दूध देण्याच्या बहाण्याने विवाहितेच्या घरात घुसलेल्या एकाने तिच्याच मोबाईलमधील पतीसोबतचे खासगी फोटो व व्हिडीओ स्वत:च्या मोबाईल घेत धमकी देत तब्बल सात महिने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडितेने इंदिरानगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. दिलीप जाधव असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, १ जून ते ३१ डिसेंबर २०१९ या कालावधीत दिलीप जाधवने एका सोसायटीतील फ्लॅटमध्ये व किशोरनगरच्या गेटसमोर एका किराणा दुकानाच्या मागील बोळीत वारंवार बलात्कार केला. सुरुवातीला तो दूध देण्याच्या बहाण्याने महिलेच्या घरात घुसला. त्याने महिलेचा मोबाईल घेत त्यातील महिला व तिच्या पतीसोबतचे खासगी फोटो व व्हिडीओ स्वत:च्या मोबाईल घेतले. ते फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तो महिलेला घरात पुन्हा घुसला. विवाहितेच्या मुलांना बेडरुममध्ये कोंडून तिच्यावर बलात्कार केला. तसेच किशोरनगरच्या गेटजवळील बोळीत बलात्कार केला. याप्रकरणी अखेर विवाहितेने फिर्याद दिली.

- Advertisement -

सतत द्यायचा नवऱ्याला मारण्याची धमकी

दिलीप जाधव याने विवाहितेवर वारंवार बलात्कार केले. त्यास विवाहितेने काही महिन्यानंतर विरोध केला असता त्याने महिलेला मारहाण केली. ‘तुझ्या मुलांना व नवर्‍याला ठार मारेल’, अशी धमकी देत त्याने महिलेवर पुन्हा बलात्कार केला.पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक बरेला करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -