भिवंडीत प्लास्टिक गोदामाला भीषण आग, अग्निशमन दलाच्या चार गाड्या रवाना

भिवंडीतील प्लास्टिक गोदामाला आज भीषण आग लागली. या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरीही आग मोठ्या प्रमाणात लागली आहे.

भिवंडीतील आगसत्र थांबायचे नाव घेत नाहीय. दर आठवड्यात एका गोदामाला येथे आग लागते. आगीच्या ज्वाळांनी भिवंडीतील नागरिक होरपळून निघतात. आज पुन्हा भिवंडीतील प्लास्टिकचे गोडाऊन आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले आहे. दरम्यान, अग्निशमन दलाच्या चार गाड्या रवाना झाल्या असून आग नियंत्रणात आणण्याचे काम सुरू आहे. (A massive fire breaks out at a plastic godown in Bhiwandi, Thane, 4 fire tenders present at the spot)

भिवंडीतील प्लास्टिक गोदामाला आज भीषण आग लागली. या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरीही आग मोठ्या प्रमाणात लागली आहे. प्लास्टिकच्या गोडाऊनला ही आग लागल्याने आजूबाजूच्या परिसरात धूर मोठ्या प्रमाणात पसरला होता. आगीची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या चार गाड्या रवाना झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे कार्य सुरू आहे. सुदैवाने या आगीत जीवितहानी झालेली नाही.


भिवंडी येथे अनेक गोडाऊन आहेत. या गोडाऊनमध्ये विविध प्रकारचे कार्य सुरू असते. मोठ-मोठ्या मशिन्ससह अनेक कार्यालये असल्याने इथे मोठ्या प्रमाणात माणसांची ये-जा सुरू असते. मात्र, अनेकदा केलेल्या दुर्लक्षामुळे येथील गोडाऊनमध्ये आग लागते. येथील रस्ते निमुळते असल्याने आणि गोडाऊन एका बाजुला एका असे खेटून असल्याने आग पसरत जाते. त्यामुळे एका गोडाऊनला आग लागली की दुसऱ्या गोडाऊनपर्यंत आग पसरत जाते आणि मोठ्या प्रमाणात वित्तहानी होते. दरम्यान, आज घडलेल्या अपघातात कोणत्याही जीवितहानीची नोंद झालेली नाही.