अंमली पदार्थविरोधी यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक; NCB, FDA चे अधिकारी उपस्थित राहणार

NCB, कस्टम विभाग, एफडीए, आरपीएफ, डीआरआयचे अधिकारी बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

NCB Office Mumbai
एनसीबी कार्यालय मुंबई

अंमली पदार्थविरोधी कारवाया करणाऱ्या यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आज बैठक होणार आहे. एनसीबीच्या मुंबई कार्यालयात ही बैठक होणार आहे. या बैठकीला, एनसीबी (NCB), कस्टम विभाग (Custom Department), एफडीए (FDA), आरपीएफ (RPF), डीआरआयचे (DRI) अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. यासंदर्भातील माहिती एनसीबीचे उपमहासंचालक मुथा अशोक जैन यांनी दिली. दरम्यान, गेल्या काही दिवसात घडणाऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज होणारी बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जाते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानुसार ही बैठक आयोजित करण्यात आली आहे, असं एनसीबीचे उपमहासंचालक मुथा अशोक जैन यांनी सांगितलं. सुरुवतीला ही बैठक प्रादेशीक स्तरावर होईल, त्यानंतर राष्ट्रीय स्तरावर ही बैठक होईल. यासाठी विविध यंत्रणांना बोलावण्यात आलं आहे. सर्व मिळून ड्रग्जच्या संकटाला कसं तोंड देता येईल याचा विचार केला जाईल, असं जैन यांनी सांगितलं. तसंच, या बैठकीला सरकारी विभाग, ईडी, शैक्षणिक विभाग, एनजीओ, इंडस्ट्रीच्या लोकांना देखील बोलावलं आहे.

दरम्यान, अंमली पदार्थविरोधी यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची होणारी बैठक महत्त्वाची मानली जात आहे. कारण गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ सापडत आहेत. अदानी यांच्या मुंद्रा पोर्टवर सापडलेलं ३ हजार किलोंचे ड्रग्ज असतील किंवा मुंबईच्या एनसीबी विभआगाने क्रूझ पार्टीवर टाकलेले छापे या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची असणार आहे.