सांताक्रूझ येथील अल्पवयीन मुलाने विम्याच्या पैशांसाठी दिवाळीच्या फटाक्यांपासून बनवला बॉम्ब

मंगळवारी रात्री मुंबईतील जोगेश्वरी परिसरातील ब्लु डार्ट एक्सप्रेसच्या एका कार्यालयात जोरदार स्फोट झाला आणि एका पार्सल बॉक्सला अचानक आग लागली. या ठिकाणी उपस्थित असलेल्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी ही आग लगेच विझवून टाकली

मुंबईतील जोगेश्वरी परिसरातील एका अल्पवयीन मुलाने विम्याच्या पैशांसाठी बॉम्ब बनवल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. त्या अल्पवयीन मुलाने हा बॉम्ब युट्यूबवरील व्हिडीओ पाहत दिवाळीतील फटाके, बॅटरी सेल आणि जुन्या मोबाईलच्या मदतीने बनवला. शिवाय तो बॉम्ब त्याने एका कुरियर कंपनीमध्ये कुरियरद्वारे पार्सल पाठवून टायमरने उडवून दिला.

खरंतर, हा सर्व प्रकार त्या कुरियर कंपनीच्या कार्यालयात लागलेल्या आगीनंतर तपासामध्ये पोलिसांच्या निर्दशनास आला. मात्र, मुलाने हे केलं कारण कंपनी कडून मिळालेले पार्सल खराब झाल्यास विम्याचे पैसे परत मिळतात, हेच पैसे मिळवण्यासाठी त्या अल्पवयीन मुलाने ही विचित्र शक्कल लढवली.

मंगळवारी रात्री मुंबईतील जोगेश्वरी परिसरातील ब्लु डार्ट एक्सप्रेसच्या एका कार्यालयात जोरदार स्फोट झाला आणि एका पार्सल बॉक्सला अचानक आग लागली. या ठिकाणी उपस्थित असलेल्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी ही आग लगेच विझवून टाकली. ही आग विझल्यानंतर त्यांनी तो बॉक्स उघडून पाहिलं, त्यात त्यांना दिवाळीचे फुलबाजे, पाऊस, फटाके, बॅटरी सेल आणि जुन्या मोबाईलच्या मदतीने बनवलेला एक लहानगा इलेक्ट्रीक सर्कीट आढळला. त्यावेळी पोलिसांना या प्रकरणाची चौकशी करताच त्यांना सांताक्रूझच्या हनुमान टेकडी परिसरातील एका तरूण मुलाने हे पार्सल दिल्ली येथे आईला पाठविण्यासाठी दिले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

विम्याच्या पैशांसाठी बनवला बॉम्ब
पोलिसांनी सांताक्रूझच्या हनुमान टेकडी परिसरातील त्या तरूण मुलाला ताब्यात घेतले. तेव्हा त्याने आपला गुन्हा मान्य करत त्याने सांगितले की, काही दिवसांपूर्वी त्या मुलाने विम्याबाबत एक जाहिरात पाठवली होती. या जाहिरातीत एखादी वस्तू, साहित्य प्रवासादरम्यान तुटल्यास कंपनीकडून त्याची भरपाई केली जाते. यामाहितीवरून त्याने पैसे कमावण्याच्या उद्देशाने बनावट पावती बनवून त्याआधारे काही वस्तूंचा लोमबार्ड या इन्सुरन्स कंपनीकडून ऑनलाइन विमा उतरविला होता. न्यायालयाने या मुलाची रवानगी डोंगरी येथील बालसुधारगृहात केली.