घर उत्तर महाराष्ट्र दिड महिन्याच बाळ घरात एकट अडकल, आधुनिक हिरकणी थेट चौथ्या मजल्यावर गेली;...

दिड महिन्याच बाळ घरात एकट अडकल, आधुनिक हिरकणी थेट चौथ्या मजल्यावर गेली; अन्…

Subscribe

नाशिक : नाशिक शहरातील पेठरोड परिसरात अत्यंत थरारक घटना घडली आहे. २८ वर्षीय विवाहिता दीड महिन्याचा बाळा सोबत एकटी घरात होती. मात्र, कचरा बाहेर टाकण्यासाठी गेली असतांना अचानक हवेने मुख्य दरवाजा लॉक झाला. अचानक उद्भवलेल्या प्रसंगामुळे आणि घरात एकट्या असलेल्या दिन महिन्याच्या बाळाच्या विचाराने ती कासावीस झाली़. क्षणाचा विलंब न करता तिच्यातल्या आईने चौथ्या मजल्यावरच्या चार फुट ऊंच भिंतीची गॅलरीतून उडी मारुन मागच्या बाजुला असलेल्या फुटभर रुंदी असलेल्या ग्रीलच्या बाजुने तिथल्या पाईपच्या सहाय्याने आपल्या फ्लॅटच्या खिडकी जवळ आली आणि पुन्हा चार फुटांची भिंतीवरुन उडी मारत आपल्या घरात शिरली. आधी बाळाला पोटाशी लावले अन् मग आतुन दरवाजा उघडला.

झाले असे की, पती स्वप्नील जगदाळे हे तीन वर्षाची मुलगी मृण्मयी हिला घेऊन जवळच्या नातेवाईकातला साखरपुडा समारंभ असल्याने बाहेगावी गेले होते. उन्हाचा बाळाला त्रास नको म्हणून तृप्ती या दीड महिन्याच बाळ मल्हार सह घरीच थांबल्या. दरम्यान, त्यांनी दुपारी ११ च्या दरम्यान बाळाला झोपवून झोळीत टाकले. त्यानंतर घरातील केरकचरा काढून तो बाहेरील डब्यात टाकण्यासाठी गेल्या. त्याच वेळी जोरात वाऱ्याची झुळूक आली आणि मुख्य दरवाजा लॉक झाल्यामुळे तृप्ती यांची तारांबळ उडाली. त्यांचा जीव कासावीस झाला आणि बाळाजवळ पोहचण्यासाठी साठी त्या थेट बनल्या आधुनिक हिरकणी.

- Advertisement -

आई नावाच्या सजीव प्राण्यात निसर्गाने मुळातच ममत्वाचे मध भरभरुन दिलेले असते. आपल्या पोटच्या लेकरासाठी स्वत:चे सर्वस्व त्यागते तिला आई म्हणतात. आपल्या तान्हुल्याला कवेत घेणेसाठी अवघड असा कडा उतरुन येणाऱ्या हिरकणीची कथा आपण ऐकली आहे. तशीच एक गोष्ट सध्या नाशिक येथे घडली आहे. चौथ्या मजल्यावरच्या चार फुट ऊंच भिंतीची गॅलरीतुन उडी मारुन मागच्या बाजुला असलेल्या फुटभर रुंदी असलेल्या ग्रीलच्या बाजुने तेथल्या पाईपच्या सहाय्याने आपल्या फ्लॅटच्या खिडकी जवळ आल्या आणि पुन्हा चार फुटांच्या भिंतीवरुन उडी मारत आपल्या घरात गेल्या. घरात जाताच सगळ्यात आधी आपल्या बाळाला पोटाशी लावले अन् मग आतुन दरवाजा उघडला़ नी सुटकेचा श्वास सोडला.

संध्याकाळी सर्वजण घरी आल्यावर सर्वांना ही गोष्ट कळली. तिच्या बहादुरीचे कौतुक केले. चौथ्या मजल्यावरुन खाली पाहीले तरी भिती वाटुन चक्कर येते आणि ही आई चक्क ड्रेनेज पाईपच्या सहाय्याने आंत गेली? सर्वांना आश्चर्य, असे केले असते, तसे केले असते असे सल्लेही दिले. पण संकट जेंव्हा आं वासुन उभे ठाकते तेंव्हा मती गुंग होते. काहीच सुधरत नाही. त्यावेळी जे सुचते तेच अंतीम असते, या बाईतली आईला जे धैर्य सुचले तेच महत्वाचे. मातृत्वाचा तो विजय होता, का ग बाई, चौथ्या मजल्याच्या बॅक गॅलरीतुन तुला पडायची भिती नाही का वाटली? तेंव्हा ती म्हणाली, “मला त्यावेळी काहीच दिसत नव्हतं, मी खालीही पाहत नव्हती. मला दिसत होतं ते फक्त माझं बाळ” अश्या या आधुनिक हिरकणीला खरच सलाम!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -