मुंबई – भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर पुन्हा भ्रष्टाचारा आरोप केला आहे. महालक्ष्मी रेसकोर्स येथे कोविड सेंटर उभारण्याकरता किशोरी पेडणेकरांच्या कंपनीला कंत्राट देण्या आले होते. मात्र, ही बोगस कंपनी असून या कोविड सेंटरमध्ये एकही रुग्ण उपचारांसाठी आला नाही, त्यामुळे पेडणेकरांनी लाखो रुपयांची फसवणूक केली आहे, असा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. आज पत्रकार परिषद घेत त्यांनी उद्धव ठाकरेंनाही आव्हान केले आहे. फसवणूकप्रकरणी उद्धव ठाकरे पेडणेकरांवर कोणती कारवाई करणार, असा सवाल सोमय्यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा – Kirit Somaiya : नवीन वर्षात या ‘पाच’ नेत्यांवर असणार किरीट सोमय्यांची वक्रदृष्टी
किशोरी पेडणेकर यांनी त्यांची कंपनी २०१२ ला रजिस्टर करून घेतली. मात्र, बोगस सर्टिफिकेट प्रकरणी २०१३ मध्ये कंपनी अॅक्टनुसार या कंपनीवर गुन्हा दाखल कऱण्यात आला होता. २०१७ मध्ये या कंपनीने पुन्हा कागदपत्रे दिली. मात्र, या कागदपत्रात आणि फोटोमध्ये गफलत आहे. हे कागदपत्रे संजय अंधारे यांच्या नावावर आहेत. मात्र, त्यावर फोटो किशोरी पेडणेकर यांचा भाऊ संजय कदम यांचा आहे, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.
महालक्ष्मी रेसकोर्ससाठी किशोरी पेडणेकर यांच्या कंपनीला लाखो रुपये मिळाले. या कोविड सेंटरमध्ये एकही रुग्ण दाखल झाला नाही. त्यामुळे ते टेंडर १२ महिन्यांनी बंद केले. त्याचे लाखो रुपये पेडणेकरांच्या कंपनीला मिळाले. या गुन्ह्यासाठी दोन ते सात वर्षांची शिक्षा आहे. त्यामुळे मी महाराष्ट्र आणि भारत सरकराला आग्रह करणार आहे की महापौर फसवणूक करणार असीतल तर अशी प्रकरणे फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालवावीत आणि जास्तीत जास्त शिक्षा द्यावी.
हेही वाचा – एसआरए घोटाळ्यासाठी पेडणेकरांकडून मृत भावाच्या फोटोचा वापर, किरीट सोमय्यांचा कागदपत्रांसहित दावा
उद्धव ठाकरेंना आवाहन
किशोरी पेडणेकरांनी एवढी मोठी फसवणूक केली आहे, त्यामुळे त्यांच्यावर काय कारवाई करणार असा सवालही किरीट सोमय्या यांनी यावेळी उपस्थित केला.