Saturday, June 10, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र धाराशिवमधील मोठ्या बँकेत कोट्यवधींचा घोटाळा; माजी अध्यक्षांविरोधात गुन्हा दाखल

धाराशिवमधील मोठ्या बँकेत कोट्यवधींचा घोटाळा; माजी अध्यक्षांविरोधात गुन्हा दाखल

Subscribe

धाराशिव येथील सहकारी बँकेत कोट्यवधींचा घोटाळा झाल्याची माहिती समोर आली आहे. 5 कोटी 46 लाख 12 हजार रुपयांचा अपहार व फसवणूक प्रकरणी धाराशिव जनता सहकारी बँकेचे तत्कालीन अध्यक्ष, संचालक मंडळ व तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या विरुद्ध धाराशिव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धाराशिव येथील सहकारी बँकेत कोट्यवधींचा घोटाळा झाल्याची माहिती समोर आली आहे. 5 कोटी 46 लाख 12 हजार रुपयांचा अपहार व फसवणूक प्रकरणी धाराशिव जनता सहकारी बँकेचे तत्कालीन अध्यक्ष, संचालक मंडळ व तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या विरुद्ध धाराशिव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( A multi crore scam at a co operative bank in Dharashiv A case has been filed against the former president )

28 सप्टेंबर 2005 ते 31 मार्च 2008 दरम्यान धाराशिव जनता सहकारी बँकेचे तत्कालीन चेरमन, संचालक मंडळ व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संगनमत करुन नियमबाह्य पद्धीने बॉण्ड खरेदी केले. हे करताना त्यानी नोएडा टोला ब्रीज कंपनी लिमिटेड ही कंपनी दिवाळखोरीत असताना व त्या कंपनीची पडताळणी केली नाही.

- Advertisement -

तसेच, त्या कंपनीमध्ये मुंबईच्या एसीई गिल्टस ट्रेडींग प्रा.लि. या ब्रोकर कंपनीच्या मार्फत जैन सहकारी बॅंक लि. आणि बेंगळुरुच्या दि टेक्सस्टाईल को. ऑपरेटीव्ह बँक लिमिटेड येथील खात्यावरुन एकूण 4 हजार 400 डिप डिस्काऊंट बॉन्ड खरेदी करण्यासाठी प्रत्येकी 23 हजार रुपयांप्रमाणे असे जास्तीची रक्कम देऊन नियमबाह्य पद्धतीने बॉन्ड खरेदी केली.

तसचं, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या नियमावलीचे उल्लंघन करुन 5 कोटी 46 लाख 12 हजार इतक्या धाराशिव जनता सहकारी बँकेतील सभासद व ठेवीदार यांच्या रक्कमेचा अपहार करुन फसवणूक केली.

- Advertisement -

( हेही वाचा: कुठे उन्हाच्या झळा तर कुठे बरसणार पाऊस? पुढचे पाच दिवस असं असेल हवामान )

या कारणामुळे धाराशिवस सहकारी बँकेचे तत्कालीन अध्यक्ष, संचालक मंडळ व तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या विरुद्ध धाराशिव जनता सहकारी बॅंकेचे सभासद प्रविण विष्णुपंत धाबेकर वय, 53 वर्षे,. यांच्याविरोधात धाराशिव शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 173/2023 भा.द.सं कलम 420,409,34 अन्वये 19 मे 2023 रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष शेजाळ हे करत आहेत.

- Advertisment -