‘त्या’ नाल्यालगत नवीन संरक्षक भिंत उभारून रहिवाशांना देणार दिलासा

पश्चिम उपनगरातील विलेपार्ले, इंदिरा नगर - १ येथे रविवारी रात्रीच्या सुमारास नाल्यालगतची जमीन खचल्याने ७ घरांचे नुकसान झाले. तर अनेक घरांना धोका निर्माण झाला आहे. महापालिकेने नाल्यालगतच्या नागरिकांना हटविण्याचा पर्याय दिला होता. तर काही रहिवाशांना पीएपी देण्याचा विचार व्यक्त केला आहे.

मुंबई : पश्चिम उपनगरातील विलेपार्ले, इंदिरा नगर – १ येथे रविवारी रात्रीच्या सुमारास नाल्यालगतची जमीन खचल्याने ७ घरांचे नुकसान झाले. तर अनेक घरांना धोका निर्माण झाला आहे. महापालिकेने नाल्यालगतच्या नागरिकांना हटविण्याचा पर्याय दिला होता. तर काही रहिवाशांना पीएपी देण्याचा विचार व्यक्त केला आहे. मात्र रहिवाशी राहत्या ठिकाणीच पुनर्वसन करण्याबाबत आग्रही आहेत. जेव्हा की ४५० घरांची पुनर्वसन प्रक्रिया खूप लांबणीची व खर्चिक होणार आहे. त्यामुळे पालिकेने आता तात्पुरता दिलासा देण्यासाठी नाल्यालगतची जीर्ण व धोकादायक संरक्षक भिंत ज्या ठिकणी खचली ती पाडून सदर ठिकाणी नवीन संरक्षक भिंत उभारून देणार आहे. (A new protective wall will be erected along drain to provide relief to the residents)

मुंबई महापालिकेच्या के/ पश्चिम विभाग कार्यालयात मंगळवारी सकाळी सहाय्यक आयुक्त पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत लोकप्रतिनिधी, स्थानिक माजी नगरसेविका सुनीता मेहता, इंदिरा नगरमधील रहिवाशांची बैठक पार पडली. या बैठकीत रहिवाशांनी अन्यत्र स्थलांतरित होण्यास नकार दिला. राहत्या ठिकाणीच पुनर्वसन करण्याची मागणी लावून धरली. मात्र एवढ्या ४५० घरांसाठी पर्यायी पीएपी देण्याबाबत पालिकेने असमर्थता दर्शवली. तसेच, एवढ्या लोकांसाठी इमारती उभारून पक्की घरे देण्यास खूपच कालावधी लागणार आहे.

महापालिका एसडब्ल्यूडी खात्याकडून सदर ठिकाणी सर्वेक्षण केले आहे. सदर भिंत नुसती दुरुस्त करून टिकणार नसल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला आहे. त्यामुळेच पर्याय म्हणून पालिकेने सदर नाल्यालगतची जीर्ण व धोकादायक झालेली भिंत पूर्णपणे पाडून सदर ठिकाणी नवीन संरक्षक भिंत उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रहिवाशांना बऱ्यापैकी दिलासा मिळणार आहे.

वास्तविक, सदर घटनेची पूर्व चाहूल लागल्याने आणि भाजपच्या माजी नगरसेविका सुनीता मेहता व त्यांचे पती राजेश मेहता यांनी वेळीच घरे रिकामी करून रहिवाशांना पर्यायी ठिकणी तात्काळ स्थलांतरित केल्याने पुढील अनर्थ टळला. अन्यथा मोठी जीवित हानी झाली असती. दरम्यान, भाजपचे स्थानिक आमदार पराग आळवणी हे सुद्धा रहिवाशांच्या पुनर्वसनाबाबत सतत प्रयत्न करीत आहेत. तसेच, रहिवाशांची संघटनाही पुनर्वसनाबाबत चर्चा करून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करीत आहेत, अशी माहिती माजी नगरसेविका सुनीता मेहता यांनी दिली.

उंदरांनी भिंत पोखरली ?

इंदिरा नगर -१ या ठिकाणी नाल्यालगत जी संरक्षक भिंत आहे, ती उंदरांनी अक्षरशः पोखरली आहे. त्यामुळे भिंत जीर्ण व धोका झाली आहे, अशी धक्कादायक माहिती माजी नगरसेविका सुनीता मेहता यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली. त्यामुळे आता जुनी, जीर्णव धोकादायक झालेली भिंत पाडून त्या ठिकाणी नवीन मजबूत भिंत उभारणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.


हेही वाचा – शिंदे गटाला दिलासा : शिवसेना कोणाची? निर्णयाचा चेंडू सुप्रीम कोर्टाने टोलावला निवडणूक आयोगाकडे