घरमहाराष्ट्रविधिमंडळाच्या काळ्या कुट्ट इतिहासातील एक पान त्यांच्या नावावर लिहिले जाईल - संजय...

विधिमंडळाच्या काळ्या कुट्ट इतिहासातील एक पान त्यांच्या नावावर लिहिले जाईल – संजय राऊत

Subscribe

मुंबई : “एका वर्षापासून महाराष्ट्रामध्ये घटनेचा आणि कायद्याचा खून होताना मला दिसत आहे. यावर अध्यक्षांना काही वाटत नसेल, तर त्या विधिमंडळाच्या काळ्या कुट्ट इतिहासातील एक पान त्यांच्या नाववर लिहिले जाईल”, असे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. यावेळी संजय राऊतांनी आमदार अपात्रतेप्रकरण, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री सुधीर मुनंगटीवार, भाजप, एनडी, आदी मुद्यांवर भाजप आणि राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.

आमदार अपात्रतेप्रकरणाच्या सुनावणीवर संजय राऊत म्हणाले, “अनेक पक्षात विधानसभेचे अध्यक्ष होते. आम्ही विधानसभा अध्यक्षांवर दबाव आणत आहोत. हे दबाव काय असते. निर्णय घ्या, हा सर्वोच्च न्यायालयाचा दबाव आहे. आमचा नाही. आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार बोलत आहोत. विधानसभा अध्यक्षांनी घटनेनुसार शपथ घेतलेली आहे. त्या आधी त्यांनी वकिलीची सनद घेताना शपथ घेतली आहे. विधानसभा अध्यक्ष आणि आमदारकीची शपथ घेतली आहे. यानुसार अध्यक्षांनी घटनेचे रक्षण करायचे आहे. पण राहुल नार्वेकरांच्या कारर्कीदीमध्ये साधारण एक वर्षापासून महाराष्ट्रामध्ये घटनेचा आणि कायद्याचा खून होताना मला दिसत आहे. यावर अध्यक्षांना काही वाटत नसेल, तर त्या विधिमंडळाच्या काळ्या कुटु इतिहासातील एक पान त्यांच्या नाववर लिहिले जाईल. अध्यक्षांनी बेकायदेशीर सरकार चालवायला, समर्थन देत आहात. हे कितपत योग्य आहे. याचे चिंतन अध्यक्षांनी केले पाहिजे. अर्थात जनतेच्या न्यायालयामध्ये मनात या विषयी रोष आहे. आणि त्यांची किंमत सर्वांना मोजावी लागेल. जेजे या कटात आणि गुन्ह्यात सहभागी आहेत. त्या सर्वांना याची किंमत ही चुकवावी लागेल. ऐवढेची मी आज सांगू इच्छितो.”

- Advertisement -

हेही वाचा – मराठी पाट्या सक्तीच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने व्यापारी संघटनांना दिला ‘हा’ सल्ला

अविश्वास ठरावा आधी उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला हे आमच्यासाठी कल्याणाचे आहे नाही तर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री झाले नसते, असे सुधीर मुनगंटीवार या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, “त्यांना काय म्हणायचे ते म्हणू त्यात. उद्धव ठाकरेंनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला आहे. नितीमता जर भारती पक्षात गुजभर जरी शिल्लक असेल. तर ते १६ आमदारांचा निर्णय ते ताबडतोप घेतली. उद्धव ठाकरेंना ज्या दिवशी कळाले की, माझेच लोक माझ्या विरोधात गेले आहेत. तर मी विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी कशा करिता जाऊ आणि परत सरकार टीकवण्यासाठी आटापिटा का करू. याला किमान नैतिकता म्हणतात. ही नैतिकता उद्धव ठाकरे यांच्याकडे होती. आमच्याकडे ती आहे. यामुळे सुधीर मनुगंटीवार यांना ज्या गोष्टीत कल्याण वाटत आहे. 2024 साली त्यांचे आणि त्यांच्या पक्षाचे पुरते अकल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. हा माझा शब्द आहे.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -