Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र महाराष्ट्र आणि भारतातील लोकशाहीवर प्रश्नचिन्ह, जालना लाठीचार्जवरून आदित्य ठाकरेंची टीका

महाराष्ट्र आणि भारतातील लोकशाहीवर प्रश्नचिन्ह, जालना लाठीचार्जवरून आदित्य ठाकरेंची टीका

Subscribe

मुंबई : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केल्यामुळे महिलांसह अनेक उपोषणकर्ते गंभीर जखमी झाले आहेत. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या घटनेच्या अनुषंगाने महाराष्ट्र आणि भारतातील लोकशाहीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याची टीका राज्याचे माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

- Advertisement -

आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून जालन्यातील घटनेचा निषेध केला आहे. आपल्या हक्कांसाठी उपोषण करणाऱ्या मराठा समाजातील तरुणांवर बेकायदेशीर शिंदे- भाजपा सरकारने अमानुषपणे लाठीचार्ज केला. सर्व वयोगटातील महिला आणि पुरुषांवर क्रूरपणे करण्यात आलेला हा लाठीचार्ज केवळ हृदयद्रावकच नाही तर, संतापजनकही आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – विरोधकांनी तारतम्य बाळगायला हवे, जालन्यातील घटनेवरून चित्रा वाघ यांनी सुनावले

- Advertisement -

एवढ्या संवेदनशील मुद्द्यावर सुरू असलेल्या आंदोलनावरील लाठीचार्जबाबत बेकायदेशीर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार अनभिज्ञ असणे अशक्य आहे. तरीही ते माहीत नसल्याचा आव आणतील आणि अधिकाऱ्यांना दोष देतील. अकार्यक्षम कारभार तसेच इतर कोणी आपल्या हक्कांबाबत आवाज उठवल्यास ते अजिबात सहन न करणे, यामुळे महाराष्ट्र आणि भारतातील लोकशाहीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याची टीका त्यांनी केली आहे.

हेही वाचा – सरकार मराठा समाजाला आरक्षण देऊ शकत नसल्याने…, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा आरोप

या घटनेबद्दल लाज किंवा नैतिकतेची जाणीव असती, तर बेकायदेशीर मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळ पायउतार झाले असते. पण आता, ही हुकूमशाही दर्शवणारी कृती खपवून घेतली जाणार नाही, ती लक्षात ठेवली जाईल आणि मतदानाची वेळी त्याचे पडसाद दिसतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

- Advertisment -