घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्ररंगांची बरसात; रहाडीत धप्पा मारण्याची परंपरा, का आहे नाशकात रंगपंचमीचे महत्व

रंगांची बरसात; रहाडीत धप्पा मारण्याची परंपरा, का आहे नाशकात रंगपंचमीचे महत्व

Subscribe

नाशिक : रविवार (दि. १२) साजर्‍या होत असलेल्या रंगपंचमीनिमित्त जुन्या नाशकातील रहाडी खोदण्यात आल्या असून, त्यात उडी घेत रंगांची उधळण करण्यासाठी नाशिककर सज्ज झाले आहेत. पेशवेकालीन रहाडीत धप्पा घेऊन रंग खेळण्याची जुन्या नाशिकची परंपरा आहे.

महाराष्ट्रात सर्वत्र होळीच्या दुसर्‍या दिवशी धुळवडीला रंग खेळला जातो. पण, नाशिक याला अपवाद आहे. नाशिकमध्ये रंगपंचमीला रंग खेळण्याची परंपरा आहे. अन्य शहरापेक्षा नाशिकला रंगपंचमी वेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते.
याला पेशवेकालीन परंपरा आहे. रंगोत्सवासाठी इतिहासकालीन रहाडी खुल्या करण्यात येतात. नाशिककरही त्याचा मनमुराद आनंद लुटतात. 300 वर्षांची पेशवेकालीन परंपरा असलेल्या रहाड संस्कृतीला आजही विशेष महत्व आहे. रहाडीत धप्पा मारण्यास म्हणजेच उड्या घेत रंगपंचमीची मजा लुटण्याची मजाच काही और आहे. रहाडीचा रंग करण्याची लगबग कार्यकर्त्यांमध्ये दिसून आली.

- Advertisement -
पेशवेकालीन परंपरा

पेशवेकाळापासून रंग खेळण्यासाठी जुने नाशिक व भागांत रहाडींची निर्मिती करण्यात आली होती. होळीच्या दुसर्‍या दिवसापासून रहाडीचे खोदकाम काम सुरू होते. रंगपंचमीच्या आदल्या दिवसांपर्यंत स्वच्छता करून त्यात स्वच्छ पाणी भरून ठेवले जाते. रंगपंचमीच्या दिवशी त्यात रंग तयार करून टाकले जातात. त्यानंतर विधिवत पूजा करून नागरिकांना रंग खेळण्यासाठी रहाडी खुल्या करण्यात येतात. या पेशवेकालीन रहाडीत पाणी आणि रंग मिसळून जलदेवतेची शास्त्रोक्त पद्धतीने पूजा होते. या रहाड संस्कृतीला मोठा इतिहास आहे.

इथे आहेत रहाडी

नाशिक शहरात तिवंधा चौक, शनी चौक, दिल्ली दरवाजा, तांबट अळी, मधली होळी अशा ठिकाणी रहाडी आहेत. यंदा सहाही रहाडी उघडण्यात आल्या आहेत. साधारणपणे 25 बाय 25 फुट आणि 8 फूट खोलीच्या या रहाडी आहेत. या रहाडीत वापरणारा रंग हा पूर्णपणे नैसर्गिक असतो. हा रंग इतका पक्का असतो की, एकदा यात उडी मारली तर दोन ते तीन दिवस हा निघत नाही. हजारो नाशिककर या रहाडीत उड्या मारून रंगपंचमीचा साजरी करतात.

- Advertisement -
नैसर्गिक रंगांचा वापर

रहाडीत वापरणारा रंग पाने, फुले, हळद, कुंकू यांच्या मिश्रणापासून पाच तास एका भांड्यात गरम करुन तयार केला जातो. रहाडीच वैशिष्ट्य म्हणजे रंगपंचमी साजरी झाल्यानंतर ती पुरताना प्राचीन अशा असणार्‍या बल्ल्यांचाच ( सागवानी लाकडाचे मोठे मोठे ओंडके ) वापर केला जातो. रहाडीत आधीच्या रंगाचे पाणी अर्धे रहाड भरलेली अशा पद्धतीने ठेवून त्यावर उसाचे चिपाड व त्यावर माती या पद्धतीने पुरली जाते.

दुपारी १२ वाजेच्या सुमारास विधिवत पूजेला आरंभ होईल., त्यानंतर २:३० वाजेच्या सुमारास खर्‍या अर्थाने रहाड खुली केली जाईल. यांच्या रहाडचे वैशिष्ठ असे की आम्ही लिंबाचा पाला, फुले यांच्या रसापासून रंग बनवतो. तो रंग पहाटे पासून पाण्यात उकळवला जातो. रंग पूर्णतः नैसर्गिक असल्याने कुठलाही अपाय होत नाही : मयूर भालेराव, तिवंधा चौक

ही रहाड शिवकालीन राहाड आहे. आम्ही लहानपणा पासूनच हा उत्सव बघत आलो आहे. ही आमची पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंपरा आहे. ती परंपरा पुढे घेऊन जायला आम्हाला आनंद मिळतो. आमच्या रहाडीचे महत्व असे की ही रहाड मुस्लिम बहुल भागात आहे. आणि याठिकाणी मुस्लिम बांधवही मोठ्या संख्येने सहभागी होतात. आम्हाला रहाड परंपरेचा अभिमान आहे : दुर्गेश वारे, दंडे हनुमान, काजीपुरा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -