अशी कशी नशिबानं थट्टा मांडली; अमृता फडणवीसांच्या टीकेला किशोरी पेडणेकरांचे गाण्यातून उत्तर

a song sung by shivsena leader kishori pednekar on amrita fadanvis wife of devendra fadanvis

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि शिवसेना यांच्यातील राजकीय वाद काही नवा नाही. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्यासह अमृता फडणवीस मागील महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडत असतात, तर शिवसेना नेत्यांकडून त्यांच्या टीकेला त्या तोडीचे प्रत्युत्तर दिले जाते. यात आता एका कार्यक्रमादरम्यान अमृता फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. या टीकेला आता माजी महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी गाण्यातून उत्तर दिले आहे.

किशोरी पेडणेकर यांनी गाणं गाऊनं अमृता फडणवीस यांची खिल्ली उडवली आहे. दरवेळी उद्धव ठाकरेंवर विषारी बाणाने टीका केल्याने उलट उद्धव ठाकरेंनाच आणखी प्रसिद्ध मिळते असं म्हणत पेडणेकरांनी अमृता फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

हेही वाचा : मला न बोलण्याचे आदेश, राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा खुलासा

किशोरी पेडणेकरांचे अमृता फडणवीसांना गाण्यातून उत्तर

किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, आमच्या विधानसभा संघटक अनुपमा परब यांनी एक गाणं लिहिलं आहे, मी गायिका नाही. कलाकार नाही. त्यामुळे त्यांनी लिहिलेलं गाणं मी गद्यभाषेत बोलून दाखवेन. आवडलं तर घ्या नाहीतर सोडून द्या. एक होता निर्मळ माणूस, देवेंद्र त्याचे नाव. मुख्यमंत्रिपदासाठी कटकारस्थानं केली, त्यांना एका अमृताची दृष्ट लागली हो… त्यांच्या नशिबी उपमुख्यमंत्रिपद आले. अशी कशी नशिबानं थट्टा ही मांडली, अशी कशी नशिबानं थट्टा ही मांडली. अशा शब्दात त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

हेही वाचा : …तर शिंदे गटातील आमदार निलंबनास पात्र होतील; माजी मुख्यमंत्र्यांचे संकेत

अमृता फडणवीस यांची उद्धव ठाकरेंवर टीका

जून महिन्यात राज्यात घडलेल्या राजकीय सत्तासंघर्षादरम्यान शिवसेनेत मोठी बंडखोरी झाली. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वाखाली या शिवसेनेच्या 40 आमदारांच्या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. उद्धव ठाकरेंवर ओढवलेल्या नामुष्कीवरून अमृता फडणवीस यांनी त्यांच्यावर खोचक टीका केली. बस बाई बस या कार्यक्रमात सुत्रसंचालक अभिनेता सुबोध भावे याने अमृता फडणवीस यांना कशी नशिबानं थट्टा आज मांडली हे गाणं ऐकवण्यात आले. यावेळी हे गाणं ऐकूण त्यांना कोणाचा चेहरा डोळ्यांसमोर दिसला असा प्रश्न विचारण्यात आला ज्यावर अमृता फडणवीस यांनी लगेचच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव घेतले. त्यावर त्या म्हणाल्या की, उद्धव ठाकरे यांचा मी मान आणि सन्मान ठेवते, पण हे गाणं ऐकल्यावर मला त्यांच्याच चेहरा आठवला.


हेही वाचा : मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंना डिवचलं, ‘उद्धव ठाकरे गट’ असा केला उल्लेख