अनंत चतुर्दशीला विशेष लोकलच्या सेवेची व्यवस्था करावी; जयंत पाटलांची मागणी

गणेशोत्सवानिमित्त लाखो गणेश भक्त बाप्पाच्या दर्शनासाठी लोकलने प्रवास करतात. मात्र रात्री उशीरा या प्रवाशांना लोकल सेवा उपलब्ध नसल्याने मोठ्या त्रासांचा सामना करावा लागतो. परिणामी प्रवाशांना पहाटेच्या पहिल्या लोकलची वाट पाहावी लागते. त्यामुळे रात्रभर लोकल नसल्याने स्थानकातही पहिली लोकल पकडण्यासाठी प्रवाशांची प्रचंड गर्दी जमते.

गणेशोत्सवानिमित्त लाखो गणेश भक्त बाप्पाच्या दर्शनासाठी लोकलने प्रवास करतात. मात्र रात्री उशीरा या प्रवाशांना लोकल सेवा उपलब्ध नसल्याने मोठ्या त्रासांचा सामना करावा लागतो. परिणामी प्रवाशांना पहाटेच्या पहिल्या लोकलची वाट पाहावी लागते. त्यामुळे रात्रभर लोकल नसल्याने स्थानकातही पहिली लोकल पकडण्यासाठी प्रवाशांची प्रचंड गर्दी जमते. त्यामुळे प्रवाशांची होणारी ही गैरसोय लक्षात घेता राष्ट्रवादी कॉंग्रसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्राशी चर्चा करून गणेश भक्तांसाठी रात्री उशीरा विशेष लोकलच्या सेवेची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे राष्ट्रावादीची ही गणेश भक्तांसाठी असलेली मागणी भाजपा मान्य करणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (special local services should be arranged on Anant Chaturdashi ncp State President Jayant Patil demand)

“गणेशोत्सवाच्या काळात रात्री उशिरा दर्शन घेऊन घरी परतणाऱ्या भक्तांचे हाल लक्षात घेता, राज्यसरकारने केंद्रसरकारशी चर्चा करून शेवटच्या लोकल ट्रेननंतर काही विशेष रेल्वे लोकल सेवा सुरु कराव्यात”, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. पत्राद्वारे जयंत पाटील यांनी ही मागणी केली आहे.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पत्र

आपल्या सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे मागील बुधवारी आगमन झाले आहे. मुंबईसह संपूर्ण राज्यात आनंद आणि उत्साहाचे वातावरण आहे. कोविडचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याने तब्बल दोन वर्षांनंतर आपण हा उत्सव निर्बंधांशिवाय साजरा करत आहोत.

महोदय, मुंबईत गणेशोत्सवाची शान काही औरच असते याची कल्पना आपल्याला असेलच. श्री सिद्धीविनायक मंदिर, लालबागचा राजा गणेश उत्सव मंडळ, चिंचपोकळीचा चिंतामणी, जी.एस.बी मंडळ, गिरगावचा राजा अशा अनेक प्रसिद्ध गणपतींचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठी गर्दी करत असतात. नवसाला पावणाऱ्या लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी तर भाविक, रात्र आणि दिवसही न पाहता ८-८ तास रांगेत उभे असतात. रात्री उशिरा दर्शन घेऊन परतल्यानंतर त्यांना पहाटेची पहिली रेल्वे लोकल मिळेपर्यंत वाट पहावी लागते. अशा परिस्थितीत आपण केंद्रशासनाशी चर्चा करून रात्री शेवटच्या रेल्वे लोकलनंतरही भाविकांसाठी काही विशेष रेल्वे लोकल सेवा सुरु करण्याबाबत विनंती करावी. जेणेकरून गणेशभक्तांना दिलासा मिळेल.

आपले सण, संस्कृती, उत्सव जपण्याचे अधिकार राज्यातील प्रत्येक नागरिकाला आहेच मात्र लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची काळजी घेणे ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.


हेही वाचा – शिवसेनेच्या लेखी खासदार नवनीत राणा ‘सी ग्रेड’ सिनेमाच्या अभिनेत्रीच!