Wednesday, June 7, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र शिवसेना संपर्क कार्यालयामागे सट्ट्याचा अड्डा, शिंदे गटातील महिला पदाधिकारीने केली पोलखोल

शिवसेना संपर्क कार्यालयामागे सट्ट्याचा अड्डा, शिंदे गटातील महिला पदाधिकारीने केली पोलखोल

Subscribe

जळगाव – शिवसेना संपर्क कार्यालयाच्या मागच्या बाजूला सट्ट्याचा अड्डा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार जळगावातून समोर आला आहे. शिंदे गटाच्या शोभा चौधरी यांनी या अड्ड्याची पोलखोल केल्यानंतर पोलिसांनी तिथे कारवाई केली. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जळगाव दौऱ्यावर जाणार आहेत. त्याआधीच हा प्रकार उजेडात आल्याने पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा – राज्यात पावसाचा जोर ओसरला, पुणे आणि सोलापूरला यलो अलर्ट

- Advertisement -

शिवसेनेच्या माजी महिला पदाधिकारी आणि सध्या शिंदे गटात असलेल्या शोभा चौधरी यांना या अड्ड्याविषयी माहिती मिळाली. त्यांनी याप्रकरणी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. उद्धव ठाकरे समर्थक एका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याचा सट्ट्याचा अड्डा असल्याचा आरोप शोभा चौधरी यांनी केला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यात पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध शिंदे गट असा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – शिवसेनेचा दसरा मेळावा नेस्कोवर?

- Advertisement -

नेमकं काय घडलं? 

शोभा चौधरी या आपल्या घरी जात होत्या. तेव्हा शिवसेना संपर्क कार्यालयासमोर असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या बॅनरमागे त्यांना गर्दी दिसली. या गर्दीतील एकाने शोभा चौधरी यांच्यासोबत असलेल्या तरुणीची शिट्टी मारून छेड काढली. त्यामुळे संतापलेल्या शोभा चौधरी यांनी तिथे जाऊन पाहिलं असता त्यांना सट्ट्याचा खेळ सुरू असल्याचं निदर्शनास आलं, अशी माहिती शोभा चौधरी यांनी पोलिसांना दिली आहे. यावेळी तेथे ४० ते ५० जण असल्याचंही त्यांनी सांगितलं.  अनिल लक्ष्मण माळी याच्यासह सट्टा पेढीमालक जावेद शेख सलीम या दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा – आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट, त्यानंतर ‘डुप्लिकेट’वर पुणे पोलिसांत गुन्हा; वाचा काय आहे प्रकरण?

- Advertisment -