घरठाणेमुंबई- नाशिक महामार्गावर भरधाव ट्रकची सहा वाहनांना धडक

मुंबई- नाशिक महामार्गावर भरधाव ट्रकची सहा वाहनांना धडक

Subscribe

भीषण अपघातात दोन गंभीर जखमी

भिवंडी । मुंबई- नाशिक महामार्गावरील पिंपळास फाट्याजवळ एका भरधाव ट्रकने पाच ते सहा वाहनांना जोरदार धडक दिल्याची घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली आहे. हा अपघात एवढा भीषण होता कि, दोन वाहनांचा चक्काचूर होऊन या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात अपघाताच्या घटनेची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मुंबई-नाशिक महामार्गावर भिवंडी तालुक्यातील पिपळास फाट्याजवळ महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मार्फत महामार्गावर झेब्रा क्रॉसिंगचे काम सुरू होते. त्यामुळे नाशिकच्या दिशेने जाणारे सर्व वाहनचालक आपली वाहने धीम्या गतीने चालवत होते. परंतु सोमवारी पहाटेच्या साडे तीन वाजल्याच्या सुमारास याच मार्गावर मागून भरधाव वेगात येणाऱ्या एका ट्रकने पाच ते सहा चारचाकी वाहनांना जोरदार धडक देऊन तो पसार झाला आहे.

- Advertisement -

या भीषण अपघातात एका ओला कारमधील दोन प्रवाशी गंभीर जखमी असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाख ल करण्यात आले .या घटनेची माहिती मिळताच कोनगाव पोलिस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत फरार ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर महामार्गावर झेब्रा क्रॉसिंगचे काम करणारे कामगारही या अपघातात जखमी झाले असून त्यांचे झेब्रा क्रॉसिंग पट्टा मारणाऱ्या मशीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने या दुर्घटनेमध्ये आतापर्यत जीवित हानी झालेली नसून अपघात गंभीर जखमींची नावे समजू शकली नाही. या भीषण अपघाताच्या संपूर्ण घटनेची चौकशी पोलीस पथक करीत असून महार्गावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे फरार ट्रक चालकाचा पोलिसांनी शोध सुरु केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -