Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी मुंबई-गोवा महामार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात, एकाचा मृत्यू

मुंबई-गोवा महामार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात, एकाचा मृत्यू

Subscribe

मुंबई-गोवा महामार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून २२ प्रवासी जखमी झाले आहेत. कर्नाळा खिंडीतील एका अवघड वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही बस दुभाजकाला धडकली आणि पलटी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पनवेलवरुन महाडकडे निघालेल्या भरधाव वेगाने शिवशाही बसचा कर्नाळा खिंडीत आल्यानंतर अपघात झाला. या अपघातात प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे. हा अपघात इतका भीषण होता की, बसमधील २२ प्रवासी जखमी झाले आहेत. तर एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. तसेच जखमींना पनवेल उपजिल्हा रुग्णालय तसेच कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

या बसमधून ३८ प्रवासी आणि चालक व वाहक असे एकूण ४० जण प्रवास करत होते. दिप्तेश मोरेश्वर टेमघर (३१, रा. अष्टमी, ता. रोहा) असं मृत प्रवाशाचं नाव आहे. दरम्यान, अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत.


हेही वाचा : बारसूमधील रिफायनरीबाबत पवारांना माहिती दिली – उदयोगमंत्री उदय सामंत


- Advertisement -

 

- Advertisment -