घरमहाराष्ट्रनाशिकपैसे भर नाहीतर घरातून उचलू, नाशिकमध्ये शेतकऱ्याला वसुलीसाठी धमकीचे फोन

पैसे भर नाहीतर घरातून उचलू, नाशिकमध्ये शेतकऱ्याला वसुलीसाठी धमकीचे फोन

Subscribe

शेतकऱ्यांना वसुलीसाठी धमकावल्याचा प्रकार समोर आला आहे. नाशिकच्या निफाड तालुक्यामध्ये ही घटना घडली आहे. पैसे न भरल्यास घरातून उचलून नेण्याची धमकी देण्यात आली आहे. तसंच, शिवीगाळ देखील करण्यात आली आहे. या प्रकाराने शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

निफाड तालुक्यातील उगाव येथील विश्वेश्वर कृषी सेवा केंद्रातून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी द्राक्षांच्या बागेसाठी औषधं आणि खतं उधारीवर घेतली होती. त्याची वसुली करण्यासाठी शेतकऱ्यांना धमकीचे फोन आले. क्राईम ब्रँचमधून बोलतोय असं फोनवर सांगितलं जातं, तर उधारी वसुलीची जबाबदारी आमच्या गँगने घेतली आहे. शिवाय माझा नंबर पोलिसांना दे, तक्रार कर, वकिलाकडे जा, तुला आणि त्याला कोर्टातून उचलतो आणि झोडतो, अशा शब्दात धमकावलं गेलं. एवढंच नव्हे तर जमीनी विका आणि पैसे द्या, अशी धमकी देण्यात आली. दरम्यान, निफाड उपविभागीय अधिकारी अर्चना पठारे यांना भेटून निफाड पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ तांबे यांच्याकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

कोरोना काळात द्राक्षांना मागणी न आल्याने अक्षरशः मातीमोल भावाने किंवा उघड्यावर द्राक्षे फेकून देण्याची वेळ द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांवर आली. त्यामुळे प्रपंच कसा चालवावा आणि द्राक्षाची पुढील पिके कशी घ्यावीl, या विवंचनेत असलेल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना विश्वेश्वर कृषी सेवा केंद्राच्या उधारी वसुलीसाठी फोन आल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -