घरमहाराष्ट्रकोरोनामुळे अन्य एका पोलिसाचे निधन; राज्यात एकूण ७६ पोलिसांचा मृत्यू

कोरोनामुळे अन्य एका पोलिसाचे निधन; राज्यात एकूण ७६ पोलिसांचा मृत्यू

Subscribe

राज्य पोलीस दलातील पोलिसांची संख्या आता ७६ झाली आहे. त्यात ६ पोलीस अधिकारी आणि ७० पोलीस कर्मचार्‍यांचा समावेश

देशभरात कोरोनाने थैमान घातले असताना कोरोनाने बळी जाणाऱ्यांचा आकडा देखील वाढत आहे. कोरोनाचा विळखा पोलीस दलात कायम असून कोरोनामुळे अन्य एका पोलिसाचे निधन झाले. त्यामुळे कोरोनाने मृत्यू झालेल्या राज्य पोलीस दलातील पोलिसांची संख्या आता ७६ झाली आहे. त्यात ६ पोलीस अधिकारी आणि ७० पोलीस कर्मचार्‍यांचा समावेश आहे.

शनिवारी रात्री उशिरापर्यंत कोरोनाबाधित १ हजार १७५ पोलिसांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यात १३५ पोलीस अधिकारी आहे तर इतर १ हजार ४० पोलीस कर्मचार्‍यांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. कोरोनामुळे राज्यात ७६ पोलिसांचा मृत्यू झाला असून मुंबईत सर्वाधिक ४६ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे राज्यात आतापर्यंत ३०८ पोलिसांवर जमावाकडून हल्ला झाला आहे तर त्यात ८६७ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

- Advertisement -

कोविडसंदर्भात आतापर्यंत १ लाख ०६ हजार ५६९ कॉल मुख्य नियंत्रण कक्षाला प्राप्त झाले आहेत. लॉकडाऊननंतर राज्यात १ हजार ३३५ अवैध वाहतूकीचे गुन्हे दाखल झाले आहे. याच गुन्ह्यांत ३० हजार १८३ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ९० हजार ३७१ वाहने जप्त केले आहेत. त्यांच्याकडून १२ कोटी ४१ लाख ९५ हजार ९८७ रुपयांचा दंड वसुल केला आहे.


महाराष्ट्राला मिळणार दोन लाख रेमडेसिवीर इंजेक्शन
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -