कराडजवळ भीषण अपघात; पुण्यातील तीन पैलवानांचा जागीच मृत्यू

A tragic accident near Karad Three wrestlers from Pune died on the spot
कराडजवळ भीषण अपघात; पुण्यातील तीन पैलवानांचा जागीच मृत्यू

पुणे-बंगळूरु महामार्गावर कराडजवळ दोन गाड्यांचा भीषण अपघआत झाला आहे. इनोव्हा कार आणि स्विफ्टच्या धडकेमध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये पुण्याचे तीन पहिलवान आहेत. मृत तिन्ही पैलवान कात्रज परिसरातील रहिवासी असल्याचं कळतंय. अपघातातील दोन्ही वाहनं पुण्यातील असल्याची माहिती समोर येत आहे.

भीषण अपघात झालेल्या दोन्ही गाड्या या कोल्हापुरातून पुण्याकडे जात होत्या. पाठीमागून येणाऱ्या गाडीने पुढे असलेल्या गाडीला जोरदार धडक दिली. धडक एवढ्या जोरात होती की, गाड्या पलटी होऊन झाडावर आदळल्या. भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर पाच जण जखमी झाले आहेत. जखमींना कराडच्या कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

पुणे-बंगळूरु महामार्गावर कराडजवळच्या आटके टप्पा येथे हा अपघात झाला आहे. अपघातातील दोन्ही गाड्या इनोव्हा कार आणि स्विफ्ट कोल्हापुरहून पुण्याला जात होत्या. मागून येणाऱ्या गाडीने पुढे असलेल्या गाडीला जोरदार धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की, दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झाला आहे. स्विफ्ट गाडीमध्ये एक परिवार होतं अशी माहिती समर येतेय. याभीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे.