घरमहाराष्ट्रआर्थिक भार कमी करण्यासाठी एसटीत सुरु होणार स्वेच्छानिवृत्ती योजना

आर्थिक भार कमी करण्यासाठी एसटीत सुरु होणार स्वेच्छानिवृत्ती योजना

Subscribe

लॉकडाऊनमुळे एसटी महामंडळाला मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. आता कोरोनाच्या संसर्गामुळे एसटीच्या प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे प्रवासी महसूलात लक्षणीय घट आली आहे. परिणामी भविष्यात एसटीचा गाडा हाकणे महामंडळाला जड होणार आहे. एसटी महामंडळाचा सर्वाधिक खर्च कर्मचाऱ्यांच्या वेतनावर होतो. या खर्चाची बचत करण्यासाठी आता एसटी महामंडळ ५५ वर्षे पूर्ण झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती देण्याची योजना सुरु करण्याच्या विचारात आहे. त्यामुळे एसटी महामंडळावर येणारा आर्थिक भार कमी होण्यास मदत होणार आहे.

देशासह संपूर्ण महाराष्ट्र राज्यात २२ मार्चपासून लॉकडाऊन असल्याने, राज्य परिवहन महामंडळाची वाहतूक सेवा बंद आहे. वाहतूक सेवा बंद असल्यामुळे एसटी महामंडळाचे उत्पन्न बंद झाले आहे. खर्चात काटकसर करण्याच्या दृष्टीने एसटी महामंडळ अनेक प्रयत्न सुरु केले आहे. सर्वाधिक एसटी मिळणारे उत्पन्न वृद्ध प्रवासी आणि विद्यार्थ्यांच्या वाहतूकीच्या माध्यमातून होते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वृद्धांना घराबाहेर पडण्यावर बंदी तसेच त्यांना प्रवासावर सुद्धा बंदी आणली आहे. आता शाळा आणि कॉलेज बंद असल्यामुळे एसटी बसेस खाली धावत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाला मिळणारा प्रवासी महसूल स्रोत तुटला आहे. तसेच भविष्यात शासनाकडून मिळणारे सवलतीचे पैसे एसटी महामंडळाला मिळणार नाही. परिणामी, एसटी महामंडळाला मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे.

- Advertisement -

सध्या एसटी महामंडळात १ लाख ३ हजार कर्मचारी आहेत. गेले तीन महिने वेतन देण्यासाठी एसटी महामंडळाकडे पैसे नव्हते. शासनाकडून येणाऱ्या सवलतीच्या पैशांतून एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांचे वेतन दिले आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सवलतींच्या प्रतिपूर्तीपोटी थकबाकीची रक्कम शासनाकडून २९७ कोटी रूपये येणे बाकी होते. त्यापैकी २७० कोटी रूपये शासनाने एसटी महामंडळाला गुरुवारी मंजूर केले आहेत. आता फक्त शासनाकडे २७ कोटी बाकी आहेत. मात्र पुढे एसटी कर्मचाऱ्यांना वेतन द्यायचे कसे असा मोठा प्रश्न भेडसावत आहे. त्यामुळे एसटी महामंडळ काटकसर करण्याच्या दृष्टीने प्रत्यन करत आहे. शासनाप्रमाणे एसटी महामंडळ सुद्धा कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती देण्याची योजना सुरु करण्याच्या प्रयत्नात आहे. ज्या कर्मचाऱ्यांचे वय ५५ वर्ष आहे त्यांना स्वेच्छानिवृत्ती घेता येणार आहे. स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्याच्या कार्यकाळात संपेपर्यंत महामंडळाकडून वार्षिक २० दिवसाचे वेतन देण्यात येणार असल्याची माहिती एसटी महामंडळाच्या सूत्रांनी दिली आहे.

सर्वाधिक खर्च वेतनांवर

एसटीचा वार्षिक अर्थसंकल्प (२०२०-२१) साधारण १० हजार कोटींचा आहे. प्रवासी उत्पन्न (सवलतीची रक्कम सह) व इतर उत्पन्नाचे स्त्रोत धरुन फक्त ७८००कोटी इतका महसूल जमा होईल, अशी आशा आहे. या महसूलातून फक्त एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनावर सुमारे ३५०० कोटी वार्षीक खर्च होणे अपेक्षित आहे. इंधनावर (डिझेल व ऑईल) साधारण ३००० कोटी वार्षीक खर्च होईल. स्पेअर पार्टला व टायरला साधारण ६०० कोटी इतका खर्च येतो. हा खर्च अनिवार्य आहे. या खर्चात बचत करायची असेल एसटी महामंडळातील कर्मचारी व अधिकारी कमी करणे गरजेचे आहे. कारण एसटी महामंडळाला सर्वाधिक खर्च कर्मचाऱ्यांच्या वेतनावर केला जात आहे. त्यामुळे स्वेच्छानिवृत्ती देण्याची योजना महामंडळकडून सुरु करण्यात येणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

आता कपडे करणार PPE किटचं काम! कोरोना नष्ट करण्यास IIT-ISM कडून विशेष कोटिंगची निर्मिती

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -