धारावीतील एका इमारतीला लागलेल्या भीषण आगीत महिलेचा मृत्यू 

मुंबईतील धारावी परिसरात असलेल्या अशोक मिल कंपाऊंड येथील दुमजली इमारतीमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली. बुधवारी सकाळी 11:35 वाजताच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली.

मुंबईतील धारावी परिसरात असलेल्या अशोक मिल कंपाऊंड येथील दुमजली इमारतीमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली. बुधवारी सकाळी 11:35 वाजताच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या घटनेत उषा लोंढे (62) महिलेचा दुर्दैवाने मृत्यू झाला. याबाबत महापालिका प्रशासनाकडून माहिती देण्यात आली आहे. (A woman died in a massive fire in a building in Dharavi)

मिळालेल्या माहितीनुसार, धारावीतील 90 फिट रोडवर असलेल्या अशोक मिल कंपाऊंड परिसरातील तळमजला अधिक दोन मजली इमारतीमध्ये तळमजल्याच्या जागेत आग लागल्याची घटना घडली. आग लागल्यानंतर या परिसरात असलेल्या इलेक्ट्रिक वायर, कपडे, मशिनरी आदी ज्वलनशील वस्तूंमुळे आग आणखी भडकली. ही आग लागण्याचे कारण अद्यार अस्पष्ट असून, स्थानिक पोलीस व अग्निशमन दलाचे संबंधित अधिकारी तपास करीत आहेत.

या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. दुर्दैवाने आग लागली त्यावेळी तेथील बाथरूममध्ये उषा लोंढे या अडकून पडल्या होत्या. मात्र अग्निशमन दलाने अथक प्रयत्नांनी काही कालावधीत आगीवर नियंत्रण मिळवून उषा लोंढे यांना कसेतरी बाहेर काढले व त्यांना तात्काळ उपचारासाठी नजीकच्या सायन रुग्णालयात नेले. मात्र तेथे गेल्यावर डॉक्टरांनी उषा लोंढे यांना मृत झाल्याचे घोषित केले.

शिवसेना भवनजवळ रस्त्यालगत एका चारचाकी गाडीला आग

दादर येथील शिवसेना भवनजवळ रस्त्यालगत एका चारचाकी सीएनजी सँट्रो टॅक्सी या गाडीने अचानक पेट घेतला. या पेटत्या गाडीतून स्फोटाचे आवाज आले. त्यामुळे भरदिवसा घडलेल्या या घटनेने सेनाभवन परिसरात खळबळ उडाली. सुदैवाने स्थानिक पोलिसांनी तत्परता दाखवत रस्त्यावरील वाहतूक व नागरिकांची ये-जा रोखून धरली. अग्निशमन दलाची यंत्रणा घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच पोलिसांनी व नजिकच्या कोहिनूर स्क्वेअरच्या स्टाफने त्यांच्याकडील अग्निप्रतिबंधक यंत्रणेचा वापर करून गाडीला लागलेली आग विझवली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या घटनेत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.


हेही वाचा – मी मुख्यमंत्र्यांना भेटलोच नाही; स्पष्टीकरण देत आव्हाडांचा चर्चांना पूर्णविराम