Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र नितीन गडकरींबद्दल आक्षेपार्ह मेसेज करणारा ठाकरे गटाचा कार्यकर्ता! धक्कादायक माहिती उघड

नितीन गडकरींबद्दल आक्षेपार्ह मेसेज करणारा ठाकरे गटाचा कार्यकर्ता! धक्कादायक माहिती उघड

Subscribe

नागपूर : पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीत भाजपा हरल्यानतंर केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाला होता. या मजकूर प्रकरणी यवतमालमधून एका तरुणाला ताब्यात घेतले असून तो ठाकरे गटाचा तालुकाध्यक्ष असल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

नितीन गडकरी यांनी आक्षेपार्ह मजकूर प्रकरणी नागपूर पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. गडकरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथील ठाकरे गटाच्या तालुकाध्यक्षाला सायबर पोलिसांनी ताब्यात घेतले आणि चार तासांच्या चौकशीनंतर या तरुणाला सूचना पत्र देऊन सोडण्यात आले.

- Advertisement -

प्रवीण देशमुख असे ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव असून ठाकरे गटाचा तालुकाध्यक्ष, तसेच कंत्राटदार असल्याची माहिती समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी तपास करत असताना पोलिसांनी एका व्हॉट्सअप ग्रुपच्या एडमिनला चौकशी करण्यासाठी ताब्यात घेतले होते. गडकरी यांच्या विषयी आक्षेपार्ह मजकूर प्रवीणने संबंधित व्हॉट्सअप ग्रुपवर पोस्ट केला होता. या पोस्टमागे आणखी कोणी आहे का, या दृष्टीने सायबर पोलीस अधिक तपास करत आहे.

नितीन गडकरी यांना तुरुंगातून धमकी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना बेळगाव तुरुंगातून एका आरोपीने जीवे मारण्याची धमकी १५ जानेवारी 2023 ला दिली होती. बेळगाव येथील तुरुगांत तो हत्येप्रकरणी शिक्षा भोगत आहे. जयेश कंठा असे या आरोपीचे नाव आहे. त्याने कारागृहातून केंद्रीय मंत्री गडकरी यांना धमकीचे फोन केले होते. धमकीचे फोन आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. नागपूर पोलिसांनी अवघ्या काही तासांतच तपास करुन या आरोपीचा शोध घेतला होता.
नागपूर येथे केंद्रीय मंत्री गडकरी यांचे जनसंपर्क कार्यालय आहे. या कार्यालयात १५ जानेवारीला शनिवारी सकाळी तीनवेळा निनावी फोन आला होता. या फोनद्वारे १०० कोटी खंडणीची मागणी करण्यात आली होती. खंडणी न दिल्यास बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे नागपूर पोलीस खडबडून जागे झाले होते. फोन कुठून आला. कोणी केला. याचा शोध घेण्यास पोलिसांनी लगेच सुरुवात केली.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -