घरताज्या घडामोडीदेशवंडीत वीज पडून तरुणी ठार

देशवंडीत वीज पडून तरुणी ठार

Subscribe

पोलीस पाटील मुकेश कापडी यांनी दिली माहिती

नाशिकरोड । सिन्नर तालुक्यातील देशवंडी परिसरात शनिवारी (दि.४) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास अंगावर वीज पडून युवतीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

देशवंडी गावातील शेतात राहणा-या विलास बबन कापडी यांची मुलगी आकांक्षा (१९) काही कामानिमित्त शेताला लागून असलेल्या ओढ्याजवळ गेली असताना अचानक पाऊस सुरु झाला व वीजांचा कडकडाट सुरु झाला होता. याचवेळी आकांक्षाच्या अंगावर वीज पडल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलीस पाटील मुकेश कापडी यांनी दिली. वीज पडल्याने परिसर हादरुन गेला होता. त्या दिशेने आकांक्षाच्या घरच्यांनी व नागरिकांनी धाव घेतली. घटनेची माहिती पोलीस पाटील यांनी सिन्नर पोलिसांना दिली. दरम्यान, सिन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवण्यात आल्याचे समजते.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -