घरदेश-विदेशमतदार ओळखपत्राशी आधारकार्ड होणार लिंक; १ ऑगस्टपासून महाराष्ट्रातून मोहिमेला सुरुवात

मतदार ओळखपत्राशी आधारकार्ड होणार लिंक; १ ऑगस्टपासून महाराष्ट्रातून मोहिमेला सुरुवात

Subscribe

मुंबई : मतदान ओळखपत्राशी आधार कार्ड लिंक करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला आहे. या मोहिमेला येत्या १ ऑगस्टपासून महाराष्ट्रातून सुरुवात होणार आहे. मुख्य निवडणूक अधिकारी तथा अपर मुख्य सचिव श्रीकांत देशपांडे यांनी आज मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

नवीन मतदार नोंदणी मोठ्या प्रमाणात व्हावी, यासाठी निवडणूक आयोगाने विविध उपाययोजना केल्या असून यापूर्वी वर्षातून एकदा मतदार नोंदणी केली जायची. तथापि आता मतदार नोंदणी १ जानेवारी, १ एप्रिल, १ जुलै आणि १ ऑक्टोबर अशी वर्षातून चारवेळा मतदार नोंदणी करण्यात येणार आहे. आधार क्रमांक सादर करता आला नाही, म्हणून आधार क्रमांक संलग्न करणे ऐच्छिक आहे. मतदार यादीतील कोणत्याही विद्यमान मतदाराचे नाव वगळले जाणार नाही.

- Advertisement -

आधार कार्ड मतदार ओळखपत्राशी संलग्न करण्यासाठी मतदारांना क्र. ६ ब हा फॉर्म भरायचा आहे. हा अर्ज सर्व मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर (https://eci.gov.in/) आणि मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर (https://ceo.maharashtra.gov.in/) येथे उपलब्ध असतील. त्याचप्रमाणे ६ब हा फॉर्म नॅशनल व्होटर सर्व्हिस पोर्टल (National Voter Service Portal) या संकेतस्थळावर तसेच व्होटर हेल्पलाइन अॅप (Voter Helpline APP) यावरही ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध असेल.

हेही वाचा – महागाईविरोधात निदर्शने करणाऱ्या काँग्रेसच्या ४ खासदारांचे संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबन

- Advertisement -

हा अर्ज भरताना मतदाराला आधार कार्डाला संलग्न असलेल्या मोबाइल क्रमांकावर ओटीपी पाठवला जाईल. मात्र याप्रकारे संलग्नीकरण शक्य झाले नाही किंवा स्व-प्रमाणित करावयाचे नसल्यास, तर केवळ आधार कार्डाची छायांकित प्रत सादर करून स्व-प्रमाणित न करता मतदाराला स्वतःच्या मतदार ओळखपत्र आधारशी संलग्न करता येईल. तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) घरोघरी भेटी देऊन अर्ज क्र. ६ब भरून घेतील आणि त्यांचे संगणकीकरण केले जाईल. या मोहिमेअंतर्गत निवडणूक कार्यालयांकडून राज्यव्यापी विशेष शिबिरांचे आयोजनही केले जाणार असल्याची माहिती देशपांडे यांनी दिली.

आधारकार्डशी संलग्न झाल्यामुळे हे होतील फायदे
मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड यांच्या संलग्नीकरणामुळे मतदारांच्या ओळखीचे प्रमाणीकरण होईल. त्याचबरोबर एकाच व्यक्तीचं नाव एकापेक्षा जास्त मतदारसंघात किंवा एकाच मतदारसंघात एकापेक्षा जास्त वेळा नोंदणी होणं असे प्रकार यातून टाळता येतील, निवडणूक मतदानासंबंधीची विद्यमान माहिती व आयोगाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या सूचना मतदाराला मोबाइलद्वारे अवगत करता येतील.

आधारकार्ड नसल्यास काय करायचे?
मतदाराकडे आधार क्रमांक नसल्यास नमुना क्र. ६ब मध्ये नमूद केल्याप्रमाणे त्यांना मनरेगा जॉब कार्ड, फोटोसहित किसान पासबुक, आरोग्य स्मार्ट कार्ड, वाहन परवाना, पॅनकार्ड, एनपीआरअंतर्गत आरजीआयद्वारे दिले गेलेले स्मार्ट कार्ड, पासपोर्ट, फोटोसहित पेन्शन कागदपत्रे, केंद्र / राज्य शासन कर्मचाऱ्याचे ओळखपत्र, आमदार / खासदार यांना दिलेले ओळखपत्र, सामाजिक न्याय विभागाकडील ओळखपत्र या ११ पर्यायांपैंकी कोणताही एक दस्तावेज सादर करता येईल. आधार क्रमांक डिजिट्सला मास्किंग केले जाणार आहे. सारखे फोटो असणारे फोटो शोधण्यासाठी विशेष सॉफ्टवेअरची निर्मिती करण्यात आली आहे.

हेही वाचा – शरद पवारांनी नव्हे तर माझ्याच लोकांनी मला दगा दिला, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -