घर महाराष्ट्र Aaditya Thackeray : भाजपमध्ये दुसऱ्या पक्षातला रिजेक्ट माल..., आदित्य ठाकरेंची बोचरी टीका

Aaditya Thackeray : भाजपमध्ये दुसऱ्या पक्षातला रिजेक्ट माल…, आदित्य ठाकरेंची बोचरी टीका

Subscribe

सिनेटच्या निवडणुकांवर स्थगिती आल्यानंतर आदित्य ठाकरे हे आता थेट नाशिकच्या दौऱ्यावर निघाले आहेत. पण त्याआधी त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वक्तव्याबाबत आपले मत स्पष्ट केले आहे.

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुकांना स्थगिती मिळाल्यानंतर अनेक विद्यार्थी संघटना या आक्रमक झालेल्या आहेत. तर ठाकरे गटाचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी या प्रकरणी संताप व्यक्त केला आहे. सिनेटच्या निवडणुकांवर स्थगिती आल्यानंतर आदित्य ठाकरे हे आता थेट नाशिकच्या दौऱ्यावर निघाले आहेत. आजपासून त्यांचा हा दौरा सुरू होणार असून या दौऱ्यामध्ये ते नाशिकमधील तरुण व विद्यार्थ्यांशी ते संवाद साधणार असल्याचे त्यांनी आज (ता. 19 ऑगस्ट) प्रसार माध्यमांना सांगितले. (Aaditya Thackeray criticizes BJP over Nitin Gadkari’s statement)

हेही वाचा – उद्धव ठाकरे यांच्या अहंकाराचा पिळ कायम आहे, चंद्रशेखर बावनकुळे यांचे टीकास्त्र

- Advertisement -

आदित्य ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वक्तव्याबाबत आपले मत स्पष्ट केले आहे. नितीन गडकरी यांनी म्हटले आहे की, भाजपमध्ये आता 70टक्के लोक ही डुप्लीकेट आहेत, या विधानाकडे आपण कसे पाहता असा प्रश्न पत्रकारांनी आदित्य ठाकरे यांना विचारला असता ते म्हणाले की, अनेक भाजपमधले लोक आता हेच सांगायला लागले आहेत. महाराष्ट्र भाजपची परिस्थिती अशी आहे की त्यांनी दोन पक्ष फोडले. एक परिवार फोडला. हे सगळं करून या घटनाबाह्य सरकारने जी कॅबिनेट बनवली आहे त्याच्यात भाजपला काय मिळाले?, असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.

तर, त्यांचे स्वतःचे भाजपचे लोक ज्यांनी 25-30 वर्ष मेहनत केली असेल त्यातील फक्त 5-6 च मंत्री आहेत. बाकीचे सगळे दुसऱ्या पक्षातील आहेत, ज्यांना त्यांच्या मुळ पक्षाने रिजेक्ट केले होते. त्यामुळे इतक सगळं करून महाराष्ट्राला मागे नेत असताना महाराष्ट्र भाजपला काय मिळाले, याचा विचार भाजपचा कार्यकर्ते नक्कीच करणार आहेत, अशी टीका आदित्य ठाकरे यांच्याकडून करण्यात आली आहे.

- Advertisement -

तसेच, यावेळी त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नाला उत्तर देत म्हटले आहे की, मिंधे आणि भाजप गटाची तयारी नसल्याने कालची निवडणूक स्थगित करण्यात आली. त्यामुळे निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन सुद्धा अशा पद्धतीने त्या स्थगित करणे हे अत्यंत धोकादायक आहे. लोकसभेच्या निवडणुका देखील हे लोक अशाच पद्धतीने स्थगित करू शकतात. आपल्या देशात लोकशाही नाही, असे समजूनच आपल्याला पुढची वाटचाल करावी लागणार आहे, असे आदित्य ठाकरे यांच्याकडून सांगण्यात आले.

- Advertisment -