Homeमहाराष्ट्रThackeray Vs Shinde : एका माजी नगरसेविकाच्या प्रवेशावरून आदित्य ठाकरे अन् शिंदेंमध्ये...

Thackeray Vs Shinde : एका माजी नगरसेविकाच्या प्रवेशावरून आदित्य ठाकरे अन् शिंदेंमध्ये जुंपली

Subscribe

Thackeray Vs Shinde : एका माजी नगरसेविकेच्या प्रवेशावरून ठाकरे आणि शिंदेंमध्ये शाब्दिक द्वंद पेटले आहे. त्यासह निवडणुका कधीही लागण्याची शक्यता आहे. आगामी काळात असेच प्रवेश होऊ शकतात; तेव्हाही हा वाद पेटू शकतो.

मुंबई : शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. त्यापार्श्वभूमीवर शिवसेनेतील ( ठाकरे गट ) नेत्यांनी कंबर कसली असून बैठका होत आहेत. यातच मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसला आहे. शिवसेनेच्या माजी नगरसेविका राजुल पटेल यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावरून आमदार आदित्य ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात जुंपली आहे.

राजुल पटेल यांच्याबद्दल बोलताना आदित्य ठाकरे यांनी टीका केली होती. तसेच, ‘एकटे राहिलो, तरी पुन्हा आम्ही लढून जिंकून दाखवू,’ असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं. याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलं, ‘एवढं पतन होत असताना आत्मचिंतन करण्याऐवजी टीका करतात,’ असं आदित्य ठाकरेंना सुनावलं आहे.

हेही वाचा : अजितदादांची भेट घेऊन येताच क्षीरसागर यांचा मोठा दावा; म्हणाले, कृष्णा आंधळे हा…

त्यामुळे एका माजी नगरसेविकेच्या प्रवेशावरून ठाकरे आणि शिंदेंमध्ये शाब्दिक द्वंद पेटले आहे. त्यासह निवडणुका कधीही लागण्याची शक्यता आहे. आगामी काळात असेच प्रवेश होऊ शकतात; तेव्हाही हा वाद पेटू शकतो.

आदित्य ठाकरे काय म्हणाले?

“गेली अडीच वर्षे आमच्यासाठी संघर्षाची होती. त्याआधी अडीच वर्षे कोरोनाची संघर्ष करत होतो. आम्ही गद्दारांशी संघर्ष केला आहे. आता ‘ईव्हीएम’चे सरकार बसले आहे. सरकारमध्ये बसलेल्यांना सुद्धा धक्का बसला आहे की, आपण जिंकलो कसे? महापालिका निवडणुकीच्या आधी पैशांसाठी, फंडासाठी, स्वार्थासाठी, गद्दारीसाठी सोडून जातील. ज्यांना जायचे आहे, त्यांना जाऊ द्या. आमच्याकडे कुणीही पराभूत होणारे नाही. आम्ही महाराष्ट्र आणि मुंबईसाठी लढत आहोत. गद्दारी करणारे स्वत:च्या स्वार्थासाठी जात आहेत. मुंबई आणि महाराष्ट्राविरोधात गद्दार करण्यासाठी जात आहेत,” असा हल्लाबोल आदित्य ठाकरेंनी राजुल पटेल यांच्यावर केला होता.

“कुणीही गेले, तरी आम्हाला काळजी नाही. एकटे राहिलो तरी लढून जिंकून दाखवू,” असा विश्वास आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला.

शिंदेंचे प्रत्युत्तर…

“एवढे पतन झाले असताना आणि लोक सोडून जात असताना आत्मपरिक्षण, चिंतन करण्याऐवजी टीका करतात. राजुल पटेल या धडाडीच्या नगरसेविका आहेत. चारवेळा त्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. तेथील हा जनतेचा अपमान आहे. तेथील जनतेला आणि लाडक्या बहिणींचा अपमान करणाऱ्यांना महापालिका निवडणुकीत जनता जागा दाखवून देईल. ‘रस्सी जल गई पर बल नहीं गया,’ ‘जो बुंदसे गयी वो हौदसे नही आती,’ देवाने यांना सुदबुद्धी द्यावी,” असं प्रत्युत्तर एकनाथ शिंदेंनी आदित्य ठाकरेंना दिले आहे.

हेही वाचा : झिशान सिद्दीकींनी पोलीस जबाबात नाव घेताच भाजप नेते आले समोर; म्हणाले, 15 वर्षांपासून…