घरमहाराष्ट्रनागपूरAaditya Thackeray: भारतात एप्रिल फूल 'अच्छे दिन' म्हणून साजरा होतो; आदित्य ठाकरेंचा...

Aaditya Thackeray: भारतात एप्रिल फूल ‘अच्छे दिन’ म्हणून साजरा होतो; आदित्य ठाकरेंचा मोदी सरकारला टोला

Subscribe

नागपूर: देशात सध्या परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत. शिवसेनेतून बाहेर पडलेले 40 गद्दार यांनी आता विचार करायला हवा. कारण, आता चित्र स्पष्ट होत आहे. जनता आमच्या बाजूने आहे. लोकांनी यांना नाकारलं आहे. भाजपाचीही अशीच स्थिती आहे. कालच एप्रिल फूल डे झाला. जगात काही देशांमध्ये त्याला एप्रिल फूल म्हणून ओळखतात. पण आपल्या देशात त्याला अच्छे दिन म्हणून संबोधलं जात, असा थेट टोला ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मोदी सरकारला लगावला आहे. (Aaditya Thackeray In India April Fool s Day is celebrated as Achche Din Aditya Thackeray s challenge to the Modi government)

आदित्य ठाकरे नागपूरमधून बोलत होते. ते आज यवतमाळचे उमेदवार संजय देशमुख यांचा अर्ज भरण्यासाठी त्यांच्यासोबत असणार आहेत. यावेळी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारही उपस्थित राहणार आहेत.

- Advertisement -

काल एप्रिल फूल डे होता, जगात एप्रिल फूल डे म्हणून साजरा होतो तो दिवस आपल्याकडे अच्छे दिन म्हणून साजरा होतो. देशाचं भविष्य आपल्याला दिसत आहे. परिवर्तनाचे वारे सर्वत्र वाहू लागले आहेत. दिल्ली, बिहार, झारखंड, महाराष्ट्रात तुम्हाला दिसेल की, इंडिया आघाडीची बांधणी मजबूत आहे. काही महिने, काही दिवसांपूर्वी जे यांच्या विरोधात बोलत होते, त्यानं गद्दारी केली. आता कोण-कोणत्या पत्रात आहे, सगळ्यांना माहीत आहे, सगळ्यांना दिसतंय, चित्र स्पष्ट आहे, असं आदित्य ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे.

बंडखोर आणि गद्दारांमध्ये खूप फरक (Aditya Thackeray on Eknath Shinde Fraction)

आदित्य ठाकरे यांनी गद्दार आणि मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे म्हणाले की, बंडखोरी आणि गद्दारांमध्ये खूप फरत असतो. 40 गद्दार होते, त्यांचं पुढचं काय याचा विचार करावा. आता पुढचं चित्र स्पष्ट झालं आहे. जिथे-तिथे गद्दारी झाली, तिथे त्यांना लोकांनी नाकारलं आहे. गेल्या 10 वर्षांत भाजपाने केंद्रात आणि राज्यात जी कामं करायला पाहिजे होती, ती केली नाहीत. सरकारने जी आश्वासनं दिली होती, ती अपूर्ण आहेत.

- Advertisement -

(हेही वाचा: Bihar Unique Marriage: चहा प्यायला गेला अन् लग्न करून आला; चर्चा बिहारमधल्या लग्नाची)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -