Aditya Thackeray on BJP : ज्यांना डोस द्यायचा त्यांना आम्ही देतो, आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

Aditya thackeray

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यातील शेवटची जाहीर सभा आज रायगड जिल्ह्यामध्ये पार पडली. यावेळी जाहीर सभेत बोलताना आदित्य ठाकरेंनी तुफान फटकेबाजी करत भाजपवर निशाणा साधला आहे. शिवसेना म्हणून ज्यांना डोस द्यायचा त्यांना आम्ही देतो, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी भाजपवर टीका केली आहे.

तिसरा डोस घेणंही गरजेचं आहे. परंतु शिवसेना म्हणून ज्यांना डोस द्यायचा त्यांना आम्ही देतो, असं आदित्य ठाकरे म्हणाले. शिवरायांची शपथ घेऊन या रायगडमधून मी राजकीय मेळावे सुरू करत आहे. विरोधकांच्या पोटात जळजळ होतेय. त्यामुळे उगाच काहीतरी मागे लावत बसायचं, हे काम त्यांनी सरू केलंय. पण हा महाराष्ट्र लेच्या पेच्यांचा नाहीये. समोरून आलात तर प्रेमाने बाजूला बसवू. पण हातात तलवार घेऊन आलात तर आमचीही ताकत दाखवून देऊ, असं देखील आदित्य ठाकरे म्हणाले.

केंद्रात आणि राज्यात राजकीय पक्षांच्या सत्ता वेगवेगळ्या असू शकतात. पण राजकारण आपल्या जागी. मात्र, जेव्हा सरकार काम करतं तेव्हा एकमेकांचं सहकार्य असणं आवश्यक असतं, असं आदित्य ठाकरे म्हणाले. यशवंत जाधव यांच्या घरी आयकर विभागाला डायरी मिळाल्याचं सांगितलं जातय. असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता डायरीबाबत मी काहीही बोलणार नाही, कारण खूप वेगवेगळ्या डायरीबाबत चर्चा होत आहेत, असं ठाकरे म्हणाले.

शिवसेना पक्षाच्या या मेळाव्यासाठी उद्योग मंत्री सुभाष देसाई, परीवहन मंत्री अनिल परब, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि शिवसेनेचे रायगड जिल्ह्यातील आमदार उपस्थित होते.


हेही वाचा : पीएम मोदी आजच्या युगातील कृष्ण भगवान, भाजपच्या महिला खासदारांनी भगवान श्रीकृष्णाशी केली मोदींची तुलना