Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रAaditya Thackeray : मुख्यमंत्री कोण कळले का? त्या प्रश्नावर आदित्य ठाकरेंचा उलट...

Aaditya Thackeray : मुख्यमंत्री कोण कळले का? त्या प्रश्नावर आदित्य ठाकरेंचा उलट सवाल…

Subscribe

दोन दिवस झाले तरीही विधानसभा निवडणुकीच्या निकालाला तरीही अद्याप महायुतीमध्ये मुख्यमंत्री कोण? हे ठरत नसल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी टोला लगावला.

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीला धूळ चारली. 23 नोव्हेंबरला निकाल समोर आल्यानंतर भाजपने सर्वाधिक जागांवर विजय मिळवला. तर, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपला स्ट्राईक रेट चांगला ठेवत बहुमताचा आकडा सहज पार केला. तर, दुसरीकडे महाविकास आघाडीला जेमतेम एकूण 46 जागांवर विजय मिळवता आला. त्यामुळे विधानसभेत आता विरोधी पक्ष आणि विरोधी पक्षनेता यांचे काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे असताना सोमवारी (25 नोव्हेंबर) उजाडला तरीही अद्याप मुख्यमंत्री कोण? यावर निर्णय आलेला नाही. यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी माध्यमांनाच उलट सवाल केला. (Aaditya Thackeray reaction on Chief ministership in Mahayuti)

हेही वाचा : Shivsena Vs Bjp : ‘बिहार पॅटर्न’नुसार मुख्यमंत्री करा, शिंदे गटाची मागणी; भाजपचे नेते म्हणाले… 

- Advertisement -

शिवसेना उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना विरोधी पक्षनेते पदाबाबत एक प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी, “मुख्यमंत्री कोण आहेत? त्याबद्दल काही कळले का?” असा उलट सवाल केला. “तुम्ही विरोधी पक्षनेत्याबाबत विचारात आहात, तर मी तुम्हाला मुख्यमंत्रीपदाबाबत विचारतो, की कळले का कोण होणार ते?” असा सवाल त्यांनी यावेळी केला. “आता 48 तास झाले आहेत, आता कोण होईल ते बघुया,” असे म्हणत त्यांनी आपले मत व्यक्त केले. तसेच, “मुख्यमंत्री पदावर पुन्हा शिंदे बसले, तर मग जे भाजपचे 132 उमेदवार बिचारे जिंकून आले ते काय करणार? गेल्या अडीच वर्षात जसे त्यांना काही मिळाले नाही, तसेच बसणार का?” असे मत त्यांनी महायुतीतील नेत्यांना टोला लगावला.

दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली विधानसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांची सोमवारी (25 नोव्हेंबर) बैठक झाली. या बैठकीत विधानसभेचे नवनिर्वाचित सदस्य आणि विधान परिषदेचे सदस्य उपस्थित होते. यावेळी एकमताने युवानेते आदित्य ठाकरे यांच्याकडे विधानसभा आणि विधानपरिषदेच्या म्हणजेच विधिमंडळांच्या गटनेतेपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्याशिवाय तब्बल सातव्यांदा आमदार झालेले ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांच्याकडे विधानसभेच्या गटनेतेपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. तसेच, आमदार सुनील प्रभू यांच्याकडील प्रतोदपद कायम ठेवण्यात आले. त्यामुळे शिवसेना उबाठा गटात भास्कर जाधव यांचा, तर सभागृहातील आमदारांसाठी आदित्य ठाकरेंचा शब्द शिवसेना आमदारांसाठी अंतिम असणार आहे. यासह प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांच्या सहीनेच शिवसेना उबाठातील निर्णय घेण्यात येणार आहे.


Edited by Abhijeet Jadhav

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -