Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रAaditya Thackeray : वरळीत विजय पण...; राज्यातील निकालावर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया...

Aaditya Thackeray : वरळीत विजय पण…; राज्यातील निकालावर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया…

Subscribe

मुंबई : “वरळी विधानसभा मतदारसंघात माझा विजय झालेला आहे. राज्यात जिथे जिथे आम्ही निष्ठावंत म्हणून काम केले, तिथे तिथे आमचा विजय झाला आहे.” असे म्हणत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आपल्या विजयावर भावना व्यक्त केल्या आहेत. पण राज्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला राज्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. यावर बोलताना ते म्हणाले की, “हे मतदान महाराष्ट्राने केले आहे की ईव्हीएमने केले आहे हेच कळत नाही.” असे म्हणत महायुतीच्या विजयावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. (Aaditya Thackeray reaction on Maharashtra Election result 2024)

हेही वाचा : Maharashtra Election Result : महेंद्र थोरवे यांनी कर्जतचा गड राखला, सुधाकर घारे यांची कडवी झुंज अपयशी

- Advertisement -

“एकंदरीत जे राज्याचे निकाल आले आहेत, जे अपेक्षेपेक्षा वेगळे आले आहेत. उद्धव ठाकरे हे पत्रकार परिषद घेऊन त्यावर बोलतील.” असे मत आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले. ” हे मतदान महाराष्ट्राने केले आहे, की ईव्हीएम? हा एक मोठा सवाल आहे. यावर आम्ही चर्चा करु. निकालाचा आढावा घेऊ, मग बोलू,” असे म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. लोकसभेत यश मिळाले, पण विधानसभेत मात्र महाविकास आघाडीला चांगलाच फटका बसला आहे. यावर ते म्हणाले की, “हा तोच महाराष्ट्र आहे, ज्याने आम्हाला लोकसभेला आशिर्वाद दिला. महाराष्ट्रात लाट दिसत होती. पण तसे घडले नाही,” असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

सविस्तर वृत्त लवकरच…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -