घरमहाराष्ट्रनाशिकहे सरकार दिल्लीश्वरांचं आहे की महाराष्ट्राचं? राज्याचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार होणारच नाही-...

हे सरकार दिल्लीश्वरांचं आहे की महाराष्ट्राचं? राज्याचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार होणारच नाही- आदित्य ठाकरे

Subscribe

तसंच हे सरकार अल्पकाळाचं असून लवकरच कोसळणार असं देखील वक्तव्य आदित्य ठाकरेंनी केलंय.

राज्यातील सत्तांतरानंतर महाराष्ट्रात युवासेनेचे अध्यक्ष आमदार आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रा सुरू केली होती. या यात्रेचा सातवा टप्पा आजपासून सुरू होत आहे. याची सुरूवात नाशिक जिल्ह्यातून झाली असून आज ते नाशिक दौऱ्यावर आहेत. इथल्या इगतपुरीमध्ये शिवसंवाद यात्रेत संवाद साधताना शिंदे सरकारवर जोरदार टीका केलीय. “हे सरकार दिल्लीश्वरांचं आहे की महाराष्ट्राचं? राज्याचा दुसरा मंत्रिमंडळ होणारंच नाही” असं भाकित आदित्य ठाकरेंनी केलंय. तसंच हे सरकार अल्पकाळाचं असून लवकरच कोसळणार असं देखील वक्तव्य आदित्य ठाकरेंनी केलंय.

आदित्य ठाकरे सध्या नाशिकमध्ये शिवसंवाद यात्रेच्या सातव्या टप्प्यासाठी दाखल झाले आहेत. आज संध्याकाळी नाशिकमध्ये आदित्य ठाकरेंची सभा पार पडणार आहे. दरम्यान इगतपुरी इथे शिवसंवाद यात्रेची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी जनतेशी संवाद साधताना आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघात केलाय. “आजपर्यंत सरकारच्या अनेक घोषणा ऐकल्या. पण जमिनीवर काम काही दिसलं नाही. एकच घोषणा गावापर्यंत पोहोचली ती म्हणजे ‘५० खोके, एकमद ओके..’ यांचं ‘सगळं खोके आणि ओके चालतं’. स्वतः ओके झालेत. पण जनता ओके नाही.” अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारला चांगलंच घेरलं.

- Advertisement -

यापुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, “राज्याचे मुख्यमंत्री स्वतःसाठी दिल्लीला जातात, गुवाहाटी आणि सूरतला जातात…पण दिल्लीला जाऊन महाराष्ट्र राज्यासाठी काय मागितलं? असा सवाल देखील आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारला केलाय. “या सरकारमध्ये प्रत्येक आमदाराला मंत्री बनवण्याची गाजर दिली जातात. पण राज्याचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार होणारंच नाही,” असं ठाम मत आदित्य ठाकरेंनी व्यक्त केलंय. “लोकांचे विषय मागे पडलेत… नाशिकमधल्या अनेक कंपन्यांमध्ये स्थानिकांना रोजगार मिळवून द्या, शेतकऱ्यांची हक्काची नुकसान भरपाई मिळवून द्या असं देखील आदित्य ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

आज संध्याकाळी नाशिकमध्ये आदित्य ठाकरेंची सभा असून ते या सभेत काय बोलणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेला आजपासून इगतपुरी, मुंढेगाव येथील शिवसंवाद मेळाव्याने सुरूवात झाली आहे. त्यानंतर सिन्नर वडगाव पिंगळा,पळसे आणि नाशिक येथे मेळावा असणार आहे. ७ फेब्रुवारी रोजी निफाड तालुक्यातील चांदोरी, विंचूर, नांदगाव येथील मेळावा आटोपल्यानंतर दुपारी ते औरंगाबाद जिल्ह्यात प्रवेश करतील. दुपारी तीन वाजता वैजापूर तालुक्यातील महालगाव येथून त्यांच्या शिवसंवाद यात्रेला सुरूवात होईल.

८ फेब्रुवारी रोजी जालना जिल्ह्यातील सोमठाणा, रामनगर, घनसावंगी येथे तर साडेचार वाजता बीड जिल्ह्यातील गेवराई येथे आदित्य ठाकरे यांचा मेळावा होणार आहे. ९ फेब्रुवारी रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील बिडकीन, पाटोदा आणि खुल्ताबाद तालुक्यातील नंद्राबाद येथे आदित्य ठाकरे मेळावा घेणार आहेत.

शिवसंवाद मेळाव्याच्या सातव्या टप्याच्या निमित्ताने आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा पालकमंत्री संदीपान भुमरे, वैजापूरचे आमदार प्रा. रमेश बोरणारे, पश्चिमचे संजय शिरसाट आणि जालन्याचे अर्जून खोतकर यांच्या वादग्रस्त रामनगर साखर कारखाना परिसरात ही संवाद यात्रा काढली जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -