नालेसफाईचे काम झाले; आदित्य ठाकरेंचा बंडखोर आमदारांना टोला

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे देखील बंडखोर आमदारांवर सतत हल्लाबोल करत आहे. अशातच आता 'माझा आवाज गुवाहटीपर्यंत पोहोचतोय', असे म्हणत 'शिवसेनेत पावसाळ्यापूर्वी नालेसफाई झाली', टोलाही त्यांनी हाणला.

aditya thackeray

शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अनेक आमदारांनी बंड पुकारला आहे. या आमदारांच्या बंडानंतर शिवसेनेच्या (Shiv sena) नेत्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून त्यांचा विरोध केला जात आहे. तसेच राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे देखील बंडखोर आमदारांवर सतत हल्लाबोल करत आहे. अशातच आता ‘माझा आवाज गुवाहटीपर्यंत पोहोचतोय’, असे म्हणत ‘शिवसेनेत पावसाळ्यापूर्वी नालेसफाई झाली’, टोलाही त्यांनी हाणला. (aaditya thackeray slams revolt mlas in karjat shiv sena rally)

शिवसेनेच्या मेळाव्यात बोलत असताना त्यांनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. “बंडखोर आमदारांनी डोळ्यात डोळे घालून बोलावे. आमदारांना फसवून घेऊन गेलेत. त्यामुळे महाराष्ट्रात जे शिवसैनिक पाहत आहेत ते संधी म्हणून नाही, तर घाण निघून गेली आणि आता चांगले काहीतरी आपण घडवू शकू.”, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.

हेही वाचा – शिंदे गटाला सुप्रीम कोर्टाचा दिलासा, पुढील सुनावणी होणार ११ जुलैला

“पावसाळ्यापूर्वी महापालिका रस्ते साफ करते, नालेसफाई करते, नद्यांमधला गाळ साफ करतो आणि त्यानंतर संपूर्ण परिसर स्वच्छ झाल्याचे चित्र दिसते, तसेच आता झाले आहे. कायतरी होणार आहे, याची कल्पना आम्हाला पहिल्यापासूनच होती”, असे आदित्य यांनी म्हटले. तसेच, ‘किती जमिनींची देवाणघेवाण केली याची माहिती तुम्हाला माहित असेलच. पण इथे असताना ते एकदम कॉर्पोरेट लूकमध्ये फिरायचे. म्हणजे पहिले मंत्रालयात वेगळे दिसायचे आणि आता वेगळे दिसतात”, असा टोलाही त्यांनी बंडखोरांना हाणला.

”२० जूनला त्यांनी बंड पुकारला. फुटीर आमदार घेऊन गेले. यामध्ये आपले काही फसले. ते आमच्या संपर्कात आहेत. ते म्हणातात की, कसेही करून आम्हाला इथून घेऊन जा. पण गुवाहटी आणि सुरतला गेल्यानंतर त्यांची कैद्यांसारखी स्थिती झाली आहे”, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

“ते स्वत: समजत होते की आम्ही एवढे मोठे नेते आहोत. आम्ही दादागिरी करू शकतो, आम्ही काहीही करू शकतो. आहो दादागिरी तुम्ही सामान्य माणसावर कराल, पण मन कधीच जिंकू शकणार नाहीत. लोकांना कधीच जिंकणार नाही.”, असेही म्हटले.


हेही वाचा – ‘हा बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा आणि धर्मवीर आनंद दिघेंच्या विचारांचा विजय’; न्यायालयाच्या निर्णयानंतर शिंदेंचे नवे ट्विट