घरमहाराष्ट्रAaditya Thackeray : शिंदे सरकारच्या सर्व पॉलिसी सूटबुटातील लोकांसाठी; रेसकोर्सवरुन आदित्य ठाकरे...

Aaditya Thackeray : शिंदे सरकारच्या सर्व पॉलिसी सूटबुटातील लोकांसाठी; रेसकोर्सवरुन आदित्य ठाकरे कडाडले

Subscribe

मुंबई : मुंबई मनपाचा कथित रस्ते घोटाळा उघडकीस आणल्यानंतर आता ठाकरे गटाचे युवा आमदार आदित्य ठाकरे यांनी महालक्ष्मी रेसकोर्सच्या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधला आहे. शिंदे सरकारच्या सर्व पॉलिसी या सुटाबूटातील लोकांसाठी आहे. त्याशिवाय रेसकोर्सच्या जागेवर आता थीम पार्क नाही तर सेंट्रल पार्क बनविण्याचा जो काही घाट घालण्यात येत आहे, तो मुख्यमंत्री शिदे यांच्या बिल्डर मित्रासाठी आहे, त्यामुळे या जागी अंडरग्राऊंड कारपार्किंग करण्याचा जो निर्णय घेण्यात आला आहे, त्याला आमचा कायम विरोध राहणार आहे. या जागेवर आम्ही असे काही होऊ देणार नाही, असे सांगत आदित्य ठाकरेंनी सरकारला इशारा दिला आहे. (Aaditya Thackeray targeted the government over the issue of race course)

हेही वाचा.. Raut On Advani : “अडवाणींना राष्ट्रपती पदाचा सन्मान तरी…”, संजय राऊतांची खंत

- Advertisement -

ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आज (ता. 04 फेब्रुवारी) पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकार परिषदेतून त्यांनी महत्त्वाच्या मुद्द्यांवरून सरकारवर निशाणा साधत म्हटले की, बीएमसीचा प्रकल्प असलेला कोस्टल रोड प्रकल्प आम्ही राबवला. त्याच कोस्टल रोडचे काम पूर्ण न करता श्रेय घेण्याचा प्रकार सुरू आहे. निवडणुका तोंडावर आल्याने लोकार्पण करण्यात येत आहे. कोस्टल रोडच्या पहिल्या 10 किमीचे लोकार्पण पीएम मोदींकडून होत आहे. आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना सीएस बनायचे आहे किंवा दिल्लीत जायचं आहे. त्यामुळे ते खोटी माहिती देत आहेत, असा घणाघातही यावेळी आदित्य ठाकरेंनी केला.

यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, एमएमआर रिझनमध्ये अनेक गमती होत आहेत. कोस्टल रोड प्रकल्प उद्धव ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. या प्रकल्पासाठी आम्ही अनेक भेटी दिल्या. बोगद्याची सुद्धा पाहणी केली आहे. मात्र, ज्यांचा मुंबईशी काहीही सबंध नाही ते उद्घाटन करणार आहेत. डिसेंबर महिन्यात कोस्टल रोडचे काम पूर्ण व्हायला हवे होते. एमटीएचएलचे तीन महिने उद्घाटन झाले नव्हते. कोस्टल रोड पूर्ण नसतानाही उद्घाटन केले जात आहे. ज्यावेळी काम पूर्ण झाले होते, त्यावेळी निवडणुका लांब होत्या म्हणून त्यांचे उद्घाटन लांब ढकलण्यात आले होते. पण आता निवडणुका जवळ आल्याने हे उद्घाटने करू लागले आहेत. पुण्याच्या विमानतळावरील नवीन टर्मिनल इमारत तयार होऊन चार महिने झाले आहेत, तरी त्याचे उद्घाटन करण्यात आले नसल्याची माहिती आदित्य ठाकरे यांच्याकडून देण्यात आली आहे.

- Advertisement -

रेसकोर्सवर थीम पार्क नाही तर सेंट्रल पार्क…

महालक्ष्मी रेसकोर्सच्या मुद्द्यावरून बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, मुंबईचा रेसकोर्स हा केवळ रेसकोर्ससाठी ओळखला नाही जात तर त्या रेसकोर्सवर 226 एकर मोकळी जागा आहे, त्या ठिकाणी दररोज हजारो मुंबईकर धावायला येतात. त्या ठिकाणी लाफ्टर क्लब चालतात. पण त्याठिकाणी थीम पार्क होणार असे सांगण्यात येत होते. पण आता त्या ठिकाणी थीम पार्क नाही तर सेंट्रल पार्क तयार करण्यात येणार आहे, याबाबतच्या पोस्ट काल अनेक सेलिब्रिटींनी केल्या होत्या. त्यामुळे आम्ही थीम पार्कला विरोध केल्यानंतर आता बेकायदेशीर मुख्यमंत्री बिल्डर मित्रासाठी हे सर्व सुरू आहे. तुम्ही तुम्हाला हवे ते करा, पण कोणत्याही कॉन्ट्रक्टरच्या मदतीसाठी अंडरग्राऊंड कार पार्किंग करू नका, असे स्पष्टपणे आदित्य ठाकरे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

सरकारच्या सुटाबूटातील मित्रांसाठी सर्व काही सुरू…

मुंबई महानगरपालिकेला जर कुठेही एक रुपया जरी खर्च करायचा असेल तर त्यासाठी टेंडर काढावे लागते. हे सगळं जनतेच्या माहितीसाठी करावे लागते. खासगी लोकांसाठी हे करू शकत नाही. पण मुख्यमंत्र्यांच्या एका बैठकीत चर्चा झाली की मुंबईकरांच्या कराचे पैसे हे घोड्यांच्या तबेल्यासाठी वापरले जाणार आहेत. हे घोडे पोलिसांचे आहेत का? तर नाही. सैन्याचे आहेत तर ते पण नाही. हे घोडे घोड्यांची शर्यत लावणाऱ्या लोकांचे आहेत. सुटाबूटातील लोकांचे आहेत, सूटबुटकी सरकार जे आपण सगळीकडे बघत आहोत. तसंच हे सुटाबूटातील मित्रांसाठी 100 कोटी तुमच्या आमच्या मुंबईकरांचे वापरणार आहेत आणि तबेले बांधूले जाणार आहेत, असा गौप्यस्फोट आदित्य ठाकरेंनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -