Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्र"विधानसभा अध्यक्ष संविधानानुसार वागले तर...", अपात्रतेच्या प्रकरणावरून आदित्य ठाकरेंचे मोठे वक्तव्य

“विधानसभा अध्यक्ष संविधानानुसार वागले तर…”, अपात्रतेच्या प्रकरणावरून आदित्य ठाकरेंचे मोठे वक्तव्य

Subscribe

सिंधुदुर्ग : ठाकरे गटाचे युवानेते आदित्य ठाकरे यांच्या दोन दिवसीय कोकण दौऱ्याला सुरुवात झाली आहे. या दौऱ्यात ते कोणतीही जाहीर सभा न घेता खळा बैठका घेणार आहेत. त्यांच्या या खळा बैठकांना दोडामार्ग नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्ष लीना कुबल यांच्या घरापासून सुरुवात झाली आहे. त्यांच्या या दौऱ्यामध्ये कोकणातील पक्षाचे सर्वच प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. या खळा बैठकींच्या माध्यमातून आदित्य ठाकरे हे स्थानिक नागरिकांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकांना महत्त्व असणार आहे. या दौऱ्यानिमित्त आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी आमदार अपात्रता सुनावणीवरून विधानसभा अध्यक्षांबाबत मोठे वक्तव्य केले आहे. (Aaditya Thackeray’s big statement on the MLA disqualification issue)

हेही वाचा – ..तर खोके देण्याची तयारी सरकारने दाखवली असती, दुष्काळावरून वडेट्टीवारांचे सरकारवर टीकास्त्र

- Advertisement -

आजच्या पत्रकार परिषदेत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही आणि तो होणे शक्यही नाही, हे मी पहिल्या दिवसापासून सांगत आलो आहे. 31 डिसेंबरच्या आधी जो निकाल येईल तो संविधानाप्रमाणे म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिले आहे त्याप्रमाणे विधानसभा अध्यक्ष वागले तर हे सरकार बाद होणे गरजेचे आहे. पण जर का हे संविधानाविरोधात आणि लोकशाही विरोधात असतील तर हे सरकार टिकू शकेल. हे अध्यक्षही टिकू शकतील. पण हे सरकार कायद्याप्रमाणे आणि संविधानाप्रमाणे टिकू शकत नाही, असे स्पष्ट मत आदित्य ठाकरे यांच्याकडून व्यक्त करण्यात आले आहे. तसेच, सरकार वाचवण्यासाठी यांच्या दिल्लीवारी सुरू आहेत. महाराष्ट्र वाचवण्यासाठी यांच्या दिल्लीवाऱ्या नाहीत, अशी टीकाही त्यांच्याकडून करण्यात आली आहे.

हे सरकार बरखास्त करून निवडणुका घ्या, असे आम्ही सांगत आहोत. परंतु, निवडणुका घ्या असे म्हणाले की हे सरकार घाबरुन पळून जात आहे, असा टोला आदित्य यांनी लगावत नितेश राणे यांनी केलेल्या आरोपांना फारसे महत्त्व देत नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आदित्य यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यावरही निशाणा साधला आहे. गेल्या दीड वर्षात या सरकारच्या काळात एकही उद्योग महाराष्ट्रात आला नाही. सगळे उद्योग गुजरातला गेले. नको असलेले उद्योग माथी मारण्याचे काम सुरू आहे. आपली वानखेडेवरील हक्काची फायनल सुध्दा गुजरातला गेली. गेल्या दीड वर्षामध्ये उद्योग खाते हे फेल झाले आहे. अनेक प्रकल्प हे मी ट्वीट केल्यानंतर कळाले की ते महाराष्ट्राच्या बाहेर गेले आहेत, अशी टीका आदित्य ठाकरे यांच्याकडून करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -