घरमहाराष्ट्रबजेटच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंचे पालिका आयुक्तांना पत्र, लोकशाही संपवण्याच्या...

बजेटच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंचे पालिका आयुक्तांना पत्र, लोकशाही संपवण्याच्या…

Subscribe

Mumbai Budget | मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी आयुक्तांना पत्र लिहिले आहे. यामाध्यमातून त्यांनी मुंबईचे खच्चीकरण करण्यात येत असून लोकशाहीला संपवण्याचा पाया रचला जात आहे, याकडे लक्ष वेधले आहे.

Mumbai Budget | मुंबई – देशातील सर्वांत मोठी महानगर पालिका (Mumbai Corporation) असलेल्या मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प (Mumbai Budget) उद्या सादर केला जाणार आहे. मुंबई महानगर पालिकेतील लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपल्याने पालिकेवर सध्या प्रशासकीयराज आहे. त्यामुळे स्थायी समिती अस्तित्त्वात नसल्याने मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल प्रशासक म्हणून अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना पत्र लिहिले आहे. यामाध्यमातून त्यांनी मुंबईचे खच्चीकरण करण्यात येत असून लोकशाहीला संपवण्याचा पाया रचला जात आहे, याकडे लक्ष वेधले आहे.

हेही वाचा – मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात भाजप आणि शिंदे गटाचा वरचष्मा

- Advertisement -

आदित्य ठाकरे पत्रात काय म्हणाले?

दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प काही दिवसांत सादर केला जाणार असून, सर्वांच्या नजरा या अर्थसंकल्पाकडे लागल्या आहेत. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांप्रमाणे यावेळीही मुंबई महानगरपालिकेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधी व नागरिकांकडून सूचना मागवल्या आहेत.

- Advertisement -

एक मुंबईकर या नात्याने ज्यांच्यासाठी हे शहर जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. मी या शहराचे निहित स्वार्थापासून रक्षण करण्यासाठी माझ्याकडून जे काही करता येईल ते मी करेन. मुंबईकर म्हणून मी महानगरपालिकेला प्रस्तावित करू इच्छितो की, अर्थसंकल्पासाठी प्रशासकाने आस्थापन अंदाजपत्रकात पुढे जावे आणि सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांना निधी देण्यात यावा, परंतु मुंबईचे निवडून आलेले प्रतिनिधी- नगरसेवक, महापौर आणि समिती प्रमुखांच्या अनुपस्थितीत कोणतेही नवीन प्रकल्प हाती घेतले जाऊ नयेत.

महानगरपालिकेच्या अपारदर्शक कार्यपद्धतीची कोणतीही तपासणी नसणे, आर्थिक अनुशासन नसणे तसेच प्रशासकीय उच्च हातभार यासह अनेक मुद्यांवर गेल्या ५ महिन्यांपासून सर्वच राजकीय पक्षांनी वारंवार आवाज उठविला आहे.

निवडून आलेल्या प्रतिनिधींच्या अनुपस्थितीत आणि कोविडसारखी कोणतीही आणीबाणीची परिस्थिती नसताना, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण लागू नसताना पुढे जाणे तसेच मुंबई महानगरपालिकेचा आर्थिक निधी नवीन प्रकल्पांवर खर्च करणे हे नैतिकदृष्ट्या चुकीचे ठरेल, यामुळे आपल्या महान राष्ट्राच्या लोकशाही मूल्यांचा अवमान होईल. हे आपल्या लोकशाही मूल्यांच्या आणि संविधानाच्या विरोधात आहे.


सत्ताधाऱ्यांना महानगरपालिका निवडणुका घ्यायच्या नाहीयेत तसेच एक वर्षाहून अधिक काळ उलटून देखील, प्रशासनचा कारभार हा निवडून आलेल्या प्रतिनिधींशिवाय सुरु आहे, ही गोष्ट फक्त आणि फक्त मुंबईचे खच्चीकरण करण्याच्या हेतूने करण्यात येते आहे. वास्तविक पाहता ही धक्कादायक बाब असून लोकशाहीला संपवण्याचा पाया रचला जात आहे.

मला आशा आहे की, या महान लोकशाही राष्ट्राचे नागरिक म्हणून तुम्ही माझ्या नम्र विनंतीवर विचार कराल आणि निवडून आलेल्या प्रतिनिधींच्या हक्कांचे उल्लंघन न करता किंवा मुंबईकरांचे नुकसान न करता, लोकशाही मूल्यांची जपणूक करून सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांवर प्रशासन उचित निर्णय घेईल.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -