मुंबई : आज मुंबईत आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद पार पडली. त्यावेळी त्यांनी महायुती आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केल्याचे दिसून आले आहे. मुख्यमंत्री शिंदेंच्या नगरविकास खात्यात घोटाळा झाल्याचे यावेळी ते म्हणाले आहेत. तसेच मेट्रोचे काम पूर्ण होण्याआधीच पिलर्सला रंगरंगोटी करण्यात आली आहे. अर्धवट कामांवर कोणी रंगरंगोटी करत का? असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर आरोप केले आहेत. (Aaditya Thackrey Aaditya Thackrey On CM Eknath Shinde.)
तसेच हे सरकार सर्वसामान्य लोकांचे नसून कंत्रांटदारांचे असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे. मेट्रो सुरू होण्याआधीच त्याच्या पिलर्सला रंगरंगोटी देण्यात आली आहे. यामध्ये रंग कुठले वापरले आहेत? ते माहिते का? तसेच तुम्ही तुमचे घर बनवताना भिंती बनवताना अर्धवट कामावर रंगरंगोटी करता का? अर्धवट कामावर रंगरंगोटी करण्यासाठी 74 कोटी 41 लाख 92 हजार 179 रुपये उडवण्यात आले आहेत. यांच्याकडे बीएसटीला, ग्रॅज्युईटीला, दिवाळी बोनस, पोलिसांच्या घरासाठी, कापूस, सोयाबीनसाठी पैसे नाहीत. पण असे खर्च करण्यासाठी 74 कोटी आहेत. हा घोटाळा नाही, तर काय?” असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.
हेही वाचा : Kalicharan : हिंदू मतदानाला जात नाही, म्हणून मुस्लिम राजा होतो; कालीचरण महाराज जरांगेंना म्हणाले राक्षस
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. तसेच 23 तारखेला आमचे सरकार आल्यानंतर सर्व घोटाळे बाहेर आणू आणि त्यांची योग्य ती चौकशी करून कडक कारवाई करणार असल्याचे ते म्हणाले आहेत. तसेच हे सामान्य जनतेचे पैसे आहेत. कॉन्ट्रॅक्टरच्या खिशात हा पैसा जातोय, असा देखील त्यांनी यावेळी केला आहे. अशाप्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अखत्यारितील नगरविकास खात्याने हा घोटाळा केला असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे.
Edited By Komal Pawar Govalkar