घर ताज्या घडामोडी आई कुठे काय करतेच्या लेखिकेवर दु:खाचा डोंगर, पितृशोकानंतर आज आईचं निधन

आई कुठे काय करतेच्या लेखिकेवर दु:खाचा डोंगर, पितृशोकानंतर आज आईचं निधन

Subscribe

आई कुठे काय करते या मालिकेला सध्या प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळत आहे. मालिकेतील अरुंधती, अनिरुद्ध, संजना, यश, अभि, अनघा, आशुतोष, आप्पा-कांचन ही पात्र महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले आहेत. त्यामुळे ही सगळी पात्र प्रेक्षकांना आपली वाटतात. या मालिकेचं लेखन नमिता वर्तक यांनी केलं आहे. परंतु नमिता वर्तक या लेखिका सध्या वाईट परिस्थितीतून जात आहेत. कारण पितृशोकानंतर आता मायेचं छत्र हिरावल्यामुळे त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

लेखिका नमिता वर्तक यांच्या वडिलांचं १५ दिवसांपूर्वीच निधन झालं होतं. मात्र, आज त्यांच्या आईचं निधन झालं आहे. नमिता वर्तक या ज्येष्ठ प्रसिद्ध समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांच्या कन्या आहेत. त्या मागील अनेक दिवसांपासून आजारी होत्या. त्यांची सुश्रृषा करण्यासाठी नमिता वर्तक अनेक दिवसांपासून दवाखान्यात होत्या.

- Advertisement -

अभिनेते मिलिंद गवळी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. खऱ्या आयुष्यामध्ये जे आपण डोळ्यांनी बघतो ते नेहमीच तेच खरं असतं असं नाहीये, जे आपल्याला दिसतं त्याच्यामागे खूपशा गोष्टी दडलेल्या, ज्या आपल्यासमोर कधीच येत नाहीत, आपण जे डोळ्यांनी जे पाहतो तेवडच आपल्याला दिसत असतं, खूपशा गोष्टी behind the scene असतात आणि खूप काही between the lines ही असतं. जे कधीच नाही दिसत आणि या सिनेमा नाटक सिरीयल या क्षेत्रामध्ये तर सगळंच behind the scene नच असतं, सिरीयलचा 23 – 24 मिनिटाचा एपिसोडसाठी कित्येक दिवस बरीचशी मंडळी बरच काही करत असतात , पडद्याच्या मागे खूप काही घडत असतं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आपल्याला दिसस नाही,दिसत नाही तो लेखक, जो रात्रंदिवस तो डोकं फोडी करत असतो, आता लोकांना काय आवडेल, कुठल्या कलाकाराचा ट्रॅक लोकांना आवडतोय, तो लिहिल्यानंतर कळतं की कलाकाराकडे dates available नाहीयेत, तो कलाकार आजारीच पडला आहे, मघ परत लेखक डोके फोडी करतो, परत पुन्हा सगळं लिहून काढतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Milind Gawali (@milindgawali)

- Advertisement -

बर लेखकाचं जर सगळं सुरळीत चाललं असेल तर तो हे पण सगळं आनंदाने करतो, पण जर लेखकाच्याच आयुष्यात खूप काही घडत असेल , उलथा पालत होत असेल तर,“आई कुठे काय करते “ च्या लेखिका नमिता वर्तक हिचे वडील प्रसिद्ध समीक्षक कमलाकर नाडकर्णी बरेच महिने आजारी होते, त्यांची सगळी सुश्रुषा करत करत दवाखान्यात सुद्धा नमिताने “आई कुठे काय करते” चे एपिसोड लिहून दिले, 11 मार्चला रात्री दहा वाजता नाडकर्णी काकां गेले, त्या दुःखात सुद्धा “ आई कुठे काय करते “ चे एपिसोड नमिताने लिहून देत होती, काल 27 मार्च रोजी म्हणजे 16 दिवसांनी आजारपणामुळे नमिताची आई गेली,नमिताच्या दुःखाची कल्पनाच करवत नाही, आभाळा एवढं दुःख हेच असतं बहुतेक.
हे behind the scenes जे कधी येत नाही प्रेक्षकांसमोर.. हे सगळं सहन करायची तिला शक्ती मिळू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना, असं मिलिंद गवळी यांनी लिहिलं आहे.


हेही वाचा : ठरलं तर मग… परिणिती-राघवच्या नात्यावर आप पक्षाकडून शिक्कामोर्तब, असं केलं


 

- Advertisment -