Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र नाशिक आपलं महानगर ; नोकरी कट्टा

आपलं महानगर ; नोकरी कट्टा

Subscribe

या आठवड्याभरातील सरकारी नौकरीच्या संधी

महाराष्ट्र शासनाच्या वतीने १८३३१ पदांच्या पोलीस भरतीला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात शारीरिक चाचणी आणि त्यानंतर १०० गुणांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ४५०० जागांसाठी अर्ज मागविण्यात आले होते, त्याची मुदत संपली असून लकरच परीक्षेची तारीख आणि प्रवेशपत्र त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येतील.त्याशिवाय या आठवड्यात उत्तर पश्चिम रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदासाठी २०२६ जागा जाहीर करण्यात आल्या आहेत.

सध्याच्या नोकरीच्या संधी

नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि. (४०१ पद)

 • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
 • पदाचे नाव : ट्रेनी इंजिनिअर (सिव्हिल) -१३६ ,ट्रेनी इंजिनीअर (इलेक्ट्रिकल- ४१, ट्रेनी इंजिनीअर (मेकॅनिकल-१०८, ट्रेनी ऑफिसर (फायनान्स)-९९, ट्रेनी ऑफिसर (एचआर)-१४, ट्रेनी ऑफिसर (लॉ) ०३
 • पात्रता : पदानुसार पात्रता वेगळी असल्यामुळे अधिकृत जाहिरात पहावी.
 • वयोमर्यादा : २५ जानेवारी २०२२ रोजी १८ ते ३० वर्षे [एससी/एसटी-५ वर्षे सूट, ओबीसी-३ वर्षे सूट]
 • वेतनश्रेणी : शासकिय नियमानुसार
 • परीक्षा शुल्क : शुल्क नाही
 • परीक्षा दिनांक : २०२३
 • अर्ज करण्याची अंतिम तारीख : २५ जानेवारी २०२३
 • येथे करा अर्ज : https://www.nhpcindia.com

राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी, पुणे (२५१ पद)

 • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
 • पदाचे नाव : मॅनेजर (अधिकृत भाषा)- निम्न श्रेणी लिपिक- २७, पेंटर-०१ , ड्राफ्ट्समन-०१, सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर -०८ ,कंपोझिटर-कम-प्रिंटर-०१, सिनेमा प्रोजेक्शनिस्ट-II-०१ ,कुक-१२, फायरमन-१०, ब्लॅकस्मिथ-०१,टीए -बेकर & कन्फेक्शनर,- ०२ , टीए -सायकल रिपेरर- ०५, मल्टी टास्किंग स्टाफ-ऑफिस & ट्रेनिंग – १८२
 • पात्रता : पदानुसार पात्रता वेगळी असल्यामुळे अधिकृत जाहिरात पहावी.
 • वयोमर्यादा : २० जानेवारी २०२३ रोजी, [ एससी/एसटी-५ वर्षे सूट, ओबीसी-३ वर्षे सूट]  पद क्र. १, ३, ४, ८ : १८ ते २७ वर्षे पद क्र. २, ५, ६, ७, ९, १०, ११, १२ : १८ ते २५ वर्षे
 • वेतनश्रेणी : शासकीय नियमानुसार
 • परीक्षा शुल्क : शुल्क नाही
 • अर्ज करण्याची अंतिम तारीख : २० जानेवारी २०२३
 • परीक्षा : अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल.
 • येथे करा अर्ज : https://ndacivrect.gov.in

उत्तर पश्चिम रेल्वेत ‘अ‍ॅप्रेंटिस’ पद (२०२६ पद)

 • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
 • पदाचे नाव : अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
 • पात्रता : (१) ५० % गुणांसह १०वी उत्तीर्ण (२)आयटीआय (इलेक्ट्रिशियन/ कारपेंटर/पेंटर/मेसन/पाईप फिटर/फिटर/डिझेल मेकॅनिक/वायरमन/वेल्डर/एम एमटी एम./टेक्निशियन/मशीनिस्ट)
 • वयोमर्यादा : १० फेब्रुवारी २०२३ रोजी १५ ते २४ वर्षे [एससी/एसटी-५ वर्षे सूट, ओबीसी-३ वर्षे सूट]
 • वेतनश्रेणी : नियमाप्रमाणे
 • परीक्षा शुल्क : सर्वसामान्य/ओबीसी/ साठी १०० , एससी /एसटी – शुल्क नाही
 • अर्ज करण्याची अंतिम तारीख : १० फेब्रुवारी २०२३
 • परीक्षा दिनांक : २०२३
 • येथे करा अर्ज : https://rrcjaipur.in

केंद्रीय राखीव पोलीस दल (१४५८ पद)

 • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
 • पदाचे नाव : असिस्टंट सब इन्स्पेक्टर (स्टेनोग्राफर)-१४३, हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टीरियल)-१३१५
 • पात्रता : पद क्र.१ : (१) १२वी उत्तीर्ण (२) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: १० मिनिटे @ ८० श.प्र.मि., लिप्यंतरण : संगणकावर ५० मिनिटे (इंग्रजी) किंवा ६५ मिनिटे (हिंदी).
  पद क्र.२ :(१) १२वी उत्तीर्ण (२ ) संगणकावर इंग्रजी टायपिंग ३५ .प्र.मि. किंवा हिंदी टाइपिंग ३० श.प्र.मि.
 • वयोमर्यादा :२५ जानेवारी २०२३ रोजी १८ ते २५ वर्षे [ एससी/एसटी-५ वर्षे सूट, ओबीसी-३ वर्षे सूट]
 • वेतनश्रेणी : सरकारच्या नियमाप्रमाणे
 • परीक्षा शुल्क : सर्वसामान्य/ओबीसी/ साठी १०० , एससी /एसटी/महिला – शुल्क नाही
 • अर्ज करण्याची अंतिम तारीख : २५ जानेवारी २०२३
 • अधिक माहितीसाठी : https://crpf.gov.in

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (५२६ पद )

 • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
 • पदाचे नाव : असिस्टंट-३३९, ज्युनियर पर्सनल असिस्टंट-१५३,उच्च श्रेणी लिपिक-१६, स्टेनोग्राफर-१४,असिस्टंट (स्वायत्त संस्था)-०१
 • पात्रता : पदानुसार पात्रता वेगळी असल्यामुळे अधिकृत जाहिरात पहावी.
 • वयोमर्यादा : ०९ जानेवारी २०२३ रोजी १८ ते २८ वर्षे, [एससी,एसटी ५ वर्ष , ओबीसी-३ वर्ष सूट ]
 • वेतनश्रेणी : शासकीय नियमाप्रमाणे
 • परीक्षा शुल्क : सर्वसामान्य/ओबीसी/ साठी १०० , एससी /एसटी/महिला – शुल्क नाही
 • अर्ज करण्याची अंतिम तारीख : ०९ जानेवारी २०२३
 • परीक्षा : २०२३
 • येथे करा अर्ज : https://apps.ursc.gov.in/CentralOCB-2022/advt.jsp
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
प्रमोद उगलेhttps://www.mymahanagar.com/author/pramodu/
3 वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय.डिजिटल, प्रिंट मीडियाचा अनुभव. मनोरंजन, लाईफस्टाईल विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -