घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रसिसोदिया यांच्या अटकेच्या निषेधार्थ नाशकात आपचे ‘मौन’ आंदोलन

सिसोदिया यांच्या अटकेच्या निषेधार्थ नाशकात आपचे ‘मौन’ आंदोलन

Subscribe

नाशिक : दिल्ली अबकारी घोटाळयाप्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक करण्यात आली. सिसोदिया यांच्या अटकेच्या निषेधार्थ देशभरात आम आदमी पार्टीच्यावतीने आंदोलन करण्यात येत आहे. बुधवारी नाशिकमध्येही ‘मौन आंदोलन’ करत या अटकेचा निषेध नोंदविण्यात आला.

आपचे वरिष्ठ नेते मनीष सिसोदिया यांना काल सीबीआयकडून अटक करण्यात आली. या अटकेच्या निषेधार्थ नाशिकमध्ये आपच्यावतीने तीन दिवसीय ‘आर्य मौन’ धारण आंदोलन छेडण्यात आले आहे. यावेळी बोलतांना आपचे जितेंद्र भावे म्हणाले, सरकारी यंत्रणेचा विशेषता ईडी आणि सीबीआय चा सातत्याने गैरवापर करून, तुघलकी मोदी सरकार, चांगल्या, इमानदार लोकांना अडकविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. भविष्यात आम आदमी पार्टी हा भारतीय जनता पार्टीला एक सक्षम पर्याय ठरू शकेल या भीतीने आम आदमी पार्टीच्या नेत्यांना खोट्या केसेस मध्ये अडकवण्याचा प्रकार सातत्याने मोदी सरकारकडून होत आहे, त्याचेच एक उदाहरण म्हणून दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री ज्यांनी देशात शिक्षा क्रांती घडवून आणली त्यांना चुकीच्या केसमध्ये अडकवून त्यांना अटक केली आहे, देशभर सर्वत्र आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य नागरिकांकडूनही या गोष्टीचा निषेध व्यक्त केला जात आहे. या आंदोलनात दिनकर पवार, प्रसाद घोटेकर आदींसह आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते सहभागी झाले आहे.

यामुळे झाली अटक?
  • 2020-21 मध्ये दिल्लीतल्या मद्य धोरणात दिल्ली सरकारने बदल केला होता
  • काही ठराविक कंत्राटदारांनाच त्यात फायदा मिळवून दिल्याचा आरोप मनीष सिसोदिया यांच्यावर आहे
  • ठराविक संस्थांच्या परवानग्या न घेताच याबाबत लायसन्स फीमध्ये सवलत दिल्याचाही आरोप
  • मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ देणारे निर्णय हे केवळ पक्षपातीपणे घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -