घरताज्या घडामोडीडोंबिवलीच्या 'या' १० वर्षीय जलतरणपटूने ८ तासांत केले ३९ किलोमीटर अंतर पार

डोंबिवलीच्या ‘या’ १० वर्षीय जलतरणपटूने ८ तासांत केले ३९ किलोमीटर अंतर पार

Subscribe

डोंबिवलीमध्ये राहणाऱ्या १० वर्षीय आरव गोळे या जलतरणपटूने धरमतर खाडी ते गेटवे ऑफ इंडिया हे ३९ किलोमीटरचे अंतर ८ तास ४० मिनिटात पोहून पार केले आहे. ही कामगिरी पार करण्यासाठी आरवने मागील ६ महिन्यांपासून प्रचंड प्रयत्न केले होते.

डोंबिवलीमध्ये राहणाऱ्या १० वर्षीय आरव गोळे या जलतरणपटूने धरमतर खाडी ते गेटवे ऑफ इंडिया हे ३९ किलोमीटरचे अंतर ८ तास ४० मिनिटात पोहून पार केले आहे. ही कामगिरी पार करण्यासाठी आरवने मागील ६ महिन्यांपासून प्रचंड प्रयत्न केले होते. अखेर त्याचा प्रयत्नांना यश आले. (aarav gole dombivli 39 km sea distance covered through swimming from dharamtar to gateway of india in just 8 hours)

मिळालेल्या माहितीनुसार, आरवने धरमतर खाडी येथून मध्यरात्री दीडच्या सुमारास पोहण्यास सुरूवात केली. त्यानंतर तो सकाळी तो गेटवे ऑफ इंडिया येथे पोहोचला. मागील ६ महिन्यांपासून तो मुंबईतील अनेक समुद्र किनाऱ्यांवर जावून ६-७ तास ओपन सी स्विमिंगचा सराव करत होता.

- Advertisement -

आरवच्या आधी अनेक जलतरण पटुंनी अशी कामगिरी केली. पण त्यांना या अंतराचा टप्पा पार करण्यासाठी १२ ते १४ तासांचा अवधी लागला होता. दरम्यान, आरव वयाच्या तिसऱ्या वर्षीच पोहोयाला शिकला होता. त्यानंतर त्याने वयाच्या पाचव्या वर्षापासून प्रोफेशन प्रशिक्षण घेण्यासाठी सुरुवात केली.

विशेष म्हणजे आरवला या कामगिरीसाठी प्रशिक्षक राजेश गावडे, मितेश पाटोळे किशोर पाटील आणि डोंबिवली जिमखान्याचे दिलीप भोईर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

- Advertisement -

नेमके कसे केले अंतर पार

मंगळवारी मध्यरात्री एक वाजून १८ मिनिटांनी आरवने धरमतर येथे समुद्रात सूर मारला. प्रशिक्षक, निरीक्षक, आई, वडील, आजी, आजोबा यांच्या साक्षीने त्याने गेटवेच्या दिशेने कूच केली. उगवत्या सूर्याच्या साक्षीने गेटवेचा टप्पा जवळ आला असतानाच सागरी वातावरण बदलले, समोरुन लाटा उसळू लागल्या त्या वातावरणात आरवला दुप्पट क्षमतेने टप्पा पार करावा लागणार हे निदर्शनास येताच प्रशिक्षकांनी आरवला या बदलाच्या वातावरणातून सोडविण्यासाठी पाच किमीचा वळसा घेऊन गेटवेच्या दिशेने कूच करण्यास सांगितले. या वळशामुळे आरवला ज्या दोन तासात गेटवेला पोहचणे सहज शक्य होते. त्या अंतरासाठी त्याला पाच तास लागले. बुधवारी सकाळी ९.५८ ला आरवने गेटवे ऑफ इंडिया येथे पोहचला.


हेही वाचा – ‘या’ 8 क्रिकेटपटूंनी बदलला आपला धर्म; भारतीय खेळाडूंचाही समावेश

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -