घरमहाराष्ट्रआरे कॉलनीत सकल हिंदू मोर्चात गोंधळ; पोलिसांसोबत बाचाबाची

आरे कॉलनीत सकल हिंदू मोर्चात गोंधळ; पोलिसांसोबत बाचाबाची

Subscribe

आरे कॉलनीत राम मंदिर शेजारी मुस्लिम कब्रस्तान प्रसावित आहे. याला हिंदू संघटनांनी विरोध केला आहे. हा विरोध नोंदवण्यासाठी सकल हिंदू समाजाच्यावतीने रविवारी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात सर्व उत्सव मंडळे, समित्या तसेच नागरिकांच्या आणि हिंदूंच्या हितासाठी कार्यरत स्वयंसेवी संस्थांनी सहभाग घेतला होता. या मोर्चात अचानक गोंधळ झाला. मोर्चात सहभागी झालेल्या काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यातही घेतले.

मुंबईः आरे कॉलनीतीली प्रस्तावित मुस्लिम कब्रस्तानला विरोध करण्यासाठी सकल हिंदू समाजाच्यावतीने रविवारी हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला अचानक गोंधळ झाला. पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यातही घेतले.

आरे कॉलनीत राम मंदिर शेजारी मुस्लिम कब्रस्तान प्रसावित आहे. याला हिंदू संघटनांनी विरोध केला आहे. हा विरोध नोंदवण्यासाठी सकल हिंदू समाजाच्यावतीने रविवारी आरे कॉलनी येथे मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात सर्व उत्सव मंडळे, समित्या तसेच नागरिकांच्या आणि हिंदूंच्या हितासाठी कार्यरत स्वयंसेवी संस्थांनी सहभाग घेतला होता. या मोर्चात अचानक गोंधळ झाला. मोर्चात सहभागी झालेल्या काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यातही घेतले.

- Advertisement -

दरम्यान, भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. येथे भडकाऊ भाषणाला परवानगी दिली जाणार नाही, असे नमूद करत सर्वोच्च न्यायालयाने मुंबईतील प्रस्तावित सकल हिंदू मोर्चाचे चित्रीकरण करून ते न्यायालयात सादर करा, असे आदेश पोलिसांना गेल्या आठवड्यात दिले होते. त्यामुळे या मोर्चाचे चित्रिकरण पोलीस सर्वोच्च न्यायालयात सादर करणार का, असा सवाल केला जात आहे.

लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायद्याच्या मागणीसाठी गेल्या महिन्यात मुंबईत सकल हिंदू समाजाकडून हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. दादरमधील छत्रपती शिवाजी पार्कमधून सुरु झालेल्या मोर्चाची प्रभादेवीमधील कामगार मैदानाजवळ सांगता झाली. लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी हे मोर्चेकरी रस्त्यावर उरले होते. या मोर्चात भाजप नेते आशिष शेलार, खासदार मनोज कोटक, किरीट सोमय्या, चित्रा वाघ, आमदार नितेश राणे, आमदार सदा सरवणकर, आमदार प्रसाद लाड, विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, केशव उपाध्ये, खासदार गोपाळ शेट्टी, वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यासह शेकडो भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते, यासह मोर्चात मोठ्या संख्येने महिला देखील सहभागी झाल्या होत्या.

- Advertisement -

या मोर्चात मुस्लिम द्वेषी भाषणे झाली होती. त्यामुळे सकल हिंदू मोर्चाला प्रतिबंध करावे, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -