घरमहाराष्ट्रअब्दुल सत्तारांसमोर अडचणींचे विघ्न; टीईटी प्रकरणानंतर निवडणूक प्रतिज्ञापत्रामुळे अडकले चौकशीच्या फेऱ्यात

अब्दुल सत्तारांसमोर अडचणींचे विघ्न; टीईटी प्रकरणानंतर निवडणूक प्रतिज्ञापत्रामुळे अडकले चौकशीच्या फेऱ्यात

Subscribe

सत्तांरांविरोधात सिल्लोड न्यायालयात सीआरपीसी 200 अंतर्गत आयपीसी 199, 200, 420 व 34 तसेच लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 कलम 125 नुसार याचिका दाखल करण्यात आली

राज्याचे कृषी मंत्री आणि शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांच्यासमोरील अडचणींचे विघ्न काही थांबण्याचे नाव घेत नाही. टीईटी प्रकरणानंतर सत्तार आता निवडणुक प्रतिज्ञापत्रामुळे अडचणीत सापडले आहेत. निवडणूकीच्या प्रतिज्ञापत्रातील चुकीच्या माहिती दिल्याच्या आरोपाखाली सत्तारांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. याप्रकरणी सिल्लोड प्रमथमवर्ग न्यायादंडाधिकारी कोर्टाने पोलिसांना सत्तारांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी पोलिसांना सखोल चौकशी करत 60 दिवसात अहवाल सादर करायचा आहे.

सिल्लोडचे महेश शंकरपेल्ली आणि पुण्यातील डॉ. अभिषेक हरिदास यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार आणि इतरांविरोधात तक्रार दाखल केली होती. सत्तार यांनी निवडणुकीवेळी दिलेल्या शपथ पत्रात शेतजमीन, बिगरशेती जमीन, वाणिज्य इमारती, निवासी इमारती, शैक्षणिक अहर्तेबाबत तफावत असलेली माहिती सादर केली होती. एकूण त्यांच्या प्रतिज्ञा पत्राचा अभ्यास करत महेश शंकरपेल्ली आणि पुण्यातील डॉ. अभिषेक हरिदास यांनी केस दाखल केली.

- Advertisement -

याचप्रकरणी सिल्लोड न्यायालयाने सी.आर.पी.सी 202 अंतर्गत पोलिसांना तपासाचे आदेश दिले, ज्यानुसार पोलिसांनी अहवाल सादर केला, मात्र पोलिसांनी भ्रामक, त्रुटीयुक्त अहवाल सादर करत त्यांना अभय दिल्याची बाब फिर्यादींना न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली आहे. यानंतप पुन्हा सिल्लोड न्यायालयाने पोलिसांना पुन्हा एकदा सखोल चौकशी करत 60 दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

अब्दुल सत्तारांवर आरोप काय?

मंत्री अब्दुल सत्तार यांनी 2014 ते 2019 च्या निवडणूक नामनिर्देशन शपथपत्रात चुकीची माहिती दिल्याचा आरोप होत आहे. सत्तार यांनी निवडणूक नामनिर्देशन शपथपत्रात, दहिगाव येथील शेत जमिनीची किंमत 2019 ला 2,76,250 व 2014 मध्ये 5,06,000 हजार दाखवली आहे, तर सिल्लोड सर्वे नंबर 90/2 वाणिज्य इमारतीची किंमत सन 2019 मध्ये 28,500 तर 2014 मध्ये 46,000 रुपये असल्याची नमूद केली आहे.

- Advertisement -

याशिवाय सिल्लोड सर्वे नंबर 90/2 पत्नीच्या नावे असलेली वाणिज्य इमारतीची किंमत 18,55,500 तर 2014 मध्ये 1,70,000 रुपये असल्याचे नमूद केले, तर सिल्लोड सर्वे नंबर 364 निवासी इमारतीची खरेदी किंमत 2019 मध्ये 10,000 तर 2014 मध्ये 42,66,000 हजार असल्याचे म्हटले आहे. तसेच सर्वे नंबर 364 मधील पत्नीच्या नावे असलेली निवासी इमारतची किंमत सन 2019 मध्ये 1,65,000 हजार तर 2014 मध्ये 16,53,000 हजार रुपये असल्याचे नमूद केली आहे. याच प्रतिज्ञापत्रांमध्ये सन 2019 मध्ये अब्दुल सत्तार हे 1984 ला यशवंतराव चव्हाण महाविद्यालय सिल्लोड इथून BAFY असल्याचे नमूद केले तर 2014 च्या प्रतिज्ञा पत्रानुसार अब्दुल सत्तार हे HSC 1984 आणि BA अपियर्ड दाखवले आले आहे. त्यामुळे सत्तांरांविरोधात सिल्लोड न्यायालयात सीआरपीसी 200 अंतर्गत आयपीसी 199, 200, 420 व 34 तसेच लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 कलम 125 नुसार याचिका दाखल करण्यात आली.


गुलाम नबी आझाद यांचा काँग्रेसला रामराम; सोनिया गांधींना पाठवले पत्र


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -