घरमहाराष्ट्रतुमच्या बापाने तरी असं काम केलयं का...अब्दुल सत्तार यांची सटकली

तुमच्या बापाने तरी असं काम केलयं का…अब्दुल सत्तार यांची सटकली

Subscribe

राक्षसाची औलादही अशी नसेल

सिल्लोडमधील सोयगाव मतदारसंघातील विविध विकास कामांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत राज्याचे महसूल आणि ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार प्रचंड संतापले होते. राज्यातील घरकूल योजनेतील लाभार्थ्यांची थातूरमातूर यादी पाहून सत्तार यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच झापले आहे. घरकूल योजनेतील लाभार्थ्यांची यादी पाहून भर बैठकीत अधिकाऱ्यांना अब्दुल सत्तार यांनी खडेबोल सुनावले आहेत. अस काम करतात का? तुमच्या बापाने असे काम केले होते का?तुम्ही फुकटचा पगार घेता का? असा सवाल अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना म्हटले आहे. या आढावा बैठकीत प्रथमच राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा रौद्ररुप अधिकाऱ्यांना पाहायला मिळाला आहे.

राक्षसाची औलादही अशी नसेल

घरकूल योजनेसाठी आलेली यादी जशीच्या तशी छापून देता. अशी कामे तुमच्या बापाने केले होते का?तुम्हाला पगार मिळत नाही का? पंचायत समितीत फुकटचे काम करता का?लोकांकडून दलालासारखे पैसे घेता तेव्हा कसे आनंदी होता. सामन्यांची कामे करणे तुमच्याने होत नाही का? असे खडे सवाल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहेत. तुम्ही लोकांना न्याय देण्याची भूमिका घेतली पाहिजे. तसेच लोकांना घरकूल योजनेचा लाभ कसा मिळेल यासाठी तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. लोकांना मदत करायचे सोडून तुम्ही भिकारचोट धंदे सुरु केले आहेत. त्यामुळे हे धंदे आता बंद करा अशी कामं राक्षसाची औलादही करत नसेल. अशा शब्दांत अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना झापले आहे.

- Advertisement -

योजनांची १०० टक्के अंमलबजावणी करा तसेच २८ फेब्रुवारीपर्यंत सर्व योजना पूर्ण योजना झाल्या पाहिजेत असेही अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे. मी कोणत्याही ग्रामपंचायतीत जाऊन पाहणी करेल किंवा कोणत्याही घरकूलधारकाला जाऊन भेटेल. जर तुम्ही या योजनांमध्ये पैसे खाल्ले असल्याचे माझ्या कानावर आले तर माझ्यासारख्या वाईट कोण नसेल असे अब्दुल सत्तार यांनी खडसावून म्हटले आहे. गरीबांना मिळालेल्या घरकूल योजना तातडीने पुर्ण करा. नागरिकांनीच आम्हाला सत्तेत बसवले आहे. तुमचा पगार देण्यासाठी आम्हाला सत्तेवर आणले नाही. सर्व नागरिकांच्या अडचणी समजून घ्या असेही अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे.

 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -